LIC Jeevan Labh | योजनाच अशी की, कमी गुंतवणुकीत व्हा लखपती!
LIC Jeevan Labh | एलआयसी जीवन लाभ योजनेत अगदी कमी गुंतवणुकीत तुम्हाला लखपती होण्याची संधी मिळते. या योजनेचे इतर ही लाभ आहेत. याविषयी जाणून घेऊयात.
LIC Jeevan Labh | भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Life Insurance Corporation) अनेक विमा योजना (Life Insurance Policy)आहे. त्यातील काही विमा योजना प्रचंड लोकप्रिय आहेत. तर काही योजनांबाबत नागरिकांना माहिती नाही. एलआयसीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या योजनांपैकी जीवन लाभ योजना (Jeevan Labh Policy) ही एक आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे बोनस. योजनेत ग्राहकांना दोन प्रकारचा फायदा देण्यात येतो. हा फायदा बोनस रुपात मिळतो. यामध्ये पहिला बोनस हा पहिला पुनरावृत्ती (Revisionary) बोनस दिल्या जातो. तर शेवटचा बोनस हा अतिरिक्त (Additional) बोनस असतो. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे दरमहा 794 रुपयांचा प्रिमियम भरुन विमाधारकाला (Policyholder) कालावधी पूर्ण होण्याअगोदरच 5.25 लाख रुपये मिळू शकतात. यासोबतच या योजनेच्या कालावधी दरम्यान ग्राहकाला विमा संरक्षणही मिळते. 8 वर्षाच्या मुलापासून ते 50 वर्षांच्या व्यक्तीपर्यंत या योजनेचा लाभ घेता येतो. विशेष बाब म्हणजे या योजनेत ग्राहकाला कर्ज सुविधा ही मिळते.
विमा योजनेची वैशिष्ट्ये
जीवन लाभ पॉलिसीमध्ये कमीतकमी विमा रक्कम 2 लाख रुपयांची तर अधिकत्तम विमा रक्कमेची कोणतीही मर्यादा नाही. ही एक मर्यादीत प्रिमियम पॉलिसी आहे. यामध्ये ठराविक कालावधीपेक्षा कमी कालावधीसाठी रक्कम भरावी लागते. 15 वर्षांच्या पॉलिसीसाठी 10 वर्षे, 21 वर्षांच्या पॉलिसीसाठी 15 वर्षे आणि 25 वर्षांच्या पॉलिसीसाठी 16 वर्षांचा हप्ता भरावा लागणार आहे. जर दर महिन्याला 794 रुपयांचा प्रिमियम भरुन दरवर्षी विमाधारकाला 9,340 रुपयांचा हप्ता जमा करता येईल. म्हणजे पूर्ण कालावधीसाठी ग्राहकाला 1,49,045 रुपयांचा प्रिमियम जमा करावा लागणार आहे. जेव्हा पॉलिसीला 25 वर्षे पूर्ण होतील. तेव्हा कालावधी पूर्ण होतो.
म्युच्युरिटीचे लाभ
ग्राहकाला या योजनेत गुंतवणूक केल्यावर विम्याचे दोन लाख रुपये मिळतील. पुनरावृत्ती बोनसचा फायदा त्याला मिळेल. त्यापोटी 2,35,000 रुपये आणि अंतिम अतिरिक्त बोनसचे 90,000 रुपये मिळतील. म्हणजे विमाधारकाला सर्व रक्कम मिळून एकूण मॅच्युरिटी रक्कम 5,25,000 रुपये मिळतील. म्हणजे विमाधारकाला 1,49,045 रुपयांचा प्रिमियम जमा केल्यावर 5,25,000 रुपये मिळतील.
विमा संरक्षण
आता या योजनेत काय विमा संरक्षण मिळते हे बघुयात. जर ही विमा योजना घेतल्यानंतर विमाधारकाचा मृत्यू ओढावल्यास विमाधारकाच्या वारसदारांना विमा संरक्षणाची रक्कम मिळेल. वारसदाराला विमा पॉलिसीचे दोन लाख रुपये तर मिळतीलच सोबतच त्याला पुनरावृत्ती बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनसची रक्कम मिळले. ही रक्कम पॉलिसीत किती रक्कम जमा करण्यात आली यावर आधारीत असेल. विमाधारकाला या पॉलिसीवर कर्ज ही काढता येईल.