LIC च्या या पॉलिसीत दिवसाला 233 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवेळी मिळवा 17 लाख रुपये

LIC Policy | जीवन लाभ पॉलिसी हा एक नॉन-लिंक्ड प्लॅन आहे. जे लोक शेअर बाजारातील अस्थिरतेला घाबरत असतील अशा लोकांसाठी या योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरु शकते. जीवन लाभ पॉलिसीत तुम्ही दररोज फक्त 233 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवेळी 17 लाख रुपये मिळवू शकता.

LIC च्या या पॉलिसीत दिवसाला 233 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवेळी मिळवा 17 लाख रुपये
एलआयसी
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 8:57 AM

मुंबई: सरकारी योजनांपाठोपाठ आपल्याकडे जीवन बीमा निगम अर्थात LIC मधील गुंतवणूक हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. देशातील कोट्यवधी लोक खात्रीशीर आणि चांगल्या परताव्यासाठी LICच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अशा लोकांसाठी LIC ची जीवन लाभ पॉलिसी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

जीवन लाभ पॉलिसी हा एक नॉन-लिंक्ड प्लॅन आहे. जे लोक शेअर बाजारातील अस्थिरतेला घाबरत असतील अशा लोकांसाठी या योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरु शकते. जीवन लाभ पॉलिसीत तुम्ही दररोज फक्त 233 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवेळी 17 लाख रुपये मिळवू शकता.

जीवन लाभ पॉलिसीत बोनससह डेथ आणि मॅच्युरिटी असे दोन्ही लाभ मिळतात. या योजनेच्या कालावधीसाठी 10,15 आणि 16 वर्षे असे तीन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या योजनेत गुंतवणूक करण्याची किमान मर्यादा 2 लाख रुपये इतकी आहे.

योजनेचे फायदे काय?

जीवन लाभ पॉलिसीवर तुम्ही कर्ज घेऊ शकता. मात्र, त्यासाठी तीन वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच या योजनेत मॅच्युरिटी बेनिफिट, डेथ बेनिफिट, सिम्पल रिवर्जनरी बोनस आणि फायनल बोनस मिळतो.

17 लाख रुपये कसे मिळणार?

तुम्ही जीवन लाभ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून भविष्यासाठी चांगल्या पैशांची व्यवस्था करु शकता. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरु करा, तितका फायदा तुम्हाला मिळेल. तुम्हाला 17 लाख रुपयांचा परतावा हवा असेल तर 16 वर्षांचा टर्म प्लॅन घ्यावा लागेल. तुम्ही आता 23 वर्षांचे असाल आणि तुम्हाला 16 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 10 लाख इतकी सम अश्योर्ड या पर्यायाची निवड करावी. त्यानुसार तुम्हाला 10 वर्ष दररोज 233 रुपयांच्या हिशोबाने पैसे जमा करावे लागतील. मात्र, या योजनेचा प्रीमियम मासिक किंवा त्रैमासिक स्वरुपात अदा करावा लागतो. अशाप्रकारे 10 वर्षात तुम्ही एकूण 8.55 लाख रुपये गुंतवाल. त्यानंतर मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 17.13 लाख रुपये मिळतील.

संबंधित बातम्या:

Petrol Diesel price: पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ, जाणून घ्या इंधनाचा आजचा दर

Cryptocurrency मध्ये गुंतवणूक कशी कराल, जाणून घ्या एन्ट्री आणि एक्झिटची योग्य वेळ

Egg Farming: अंडी विकून व्हाल मालामाल, महिन्याला कमवाल लाखो रुपये, जाणून घ्या सर्वकाही

(LIC jeevan labh scheme get upto 17 lakh on maturity by investing 233 rs on daily basis)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.