LIC Jeevan Saral | LIC चा जोरदार प्लॅन, एकरक्कमी गुंतवणुकीवर जीवनभर मिळवा पेन्शन..

LIC Jeevan Saral | एलआयसी जीवन सरळ पेन्शन योजनेत एकरक्कमी गुंतवणूक करावी लागते. ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने योजनेत गुंतवणूक करता येते. 6 महिन्यात कर्ज सुविधाही मिळते.

LIC Jeevan Saral | LIC चा जोरदार प्लॅन, एकरक्कमी गुंतवणुकीवर जीवनभर मिळवा पेन्शन..
आयुष्यभर मिळवा पेन्शनImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 6:49 PM

LIC Jeevan Saral | भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC)अनेक योजना आहेत. त्यात एलआयसी सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Yojana) लोकप्रिय आहे. ही एक नॉन-लिंक्ड, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक त्वरित वार्षिकी योजना आहे. जोडीदारासोबतही ही योजना घेता येईल.

भारतीय आयुर्विमा महामंडळाने लोकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन 1 जुलै 2021 रोजी सरल पेन्शन योजना सुरू केली होती. अल्पावधीतच ही योजना लोकप्रिय झाली. या योजनेत गुंतवणूक करुन तुम्हीही फायदा घेऊ शकता.  वयाच्या 40 व्या वर्षापासून यामध्ये पेन्शनची सोय आहे.

या पॉलिसीची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही एकदाच प्रीमियम भरून दरमहा निश्चित उत्पन्न(Fixed income) मिळवू शकता. ही पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर तुम्ही कधीही कर्ज घेऊ शकता.

हे सुद्धा वाचा

ही पॉलिसी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येते. एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेतील लाभधारकाला मासिक 12 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते.

पॉलिसीची किमान खरेदीची किंमत, निवडलेला पर्याय आणि पॉलिसी घेणाऱ्याचे वय यावर अवलंबून असते.ही योजना 40 वर्षे ते 80 वर्षे वयोगटातील व्यक्तीला खरेदी करता येते.

या योजनेत जर तुम्हाला मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दरमहा किमान 1 हजार रुपये जमा करावे लागतील. त्याचप्रमाणे तिमाही पेन्शनसाठी किमान एका महिन्यात 3000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

एलआयसीच्या या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम भरल्यावर दोन उपलब्ध पर्यायांमधून अॅन्युइटी (Annuity) निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

पहिल्या पर्यायांतर्गत पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील आणि त्याचा मृत्यू झाल्यास वारसदाराला 100 टक्के विमा रक्कम दिली जाईल.

दुसरा पर्याय म्हणजे पॉलिसीधारकाला आयुष्यभरासाठी पेन्शन मिळेल. त्यांच्या निधनानंतर पती-पत्नीला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. त्यातील एखादा साथीदार नसेल तर दुसऱ्याला विमा रक्कम देण्यात येणार आहे.

तरुण वयात एक रक्कमी गुंतवणूक केल्यास ग्राहकाला वयाच्या 40 व्या वर्षांपासूनच पेन्शन सुरु होते. त्यासाठी त्याला 60 व्या वर्षाची वाट पाहण्याची गरज नाही. पण त्यासाठी एकरक्कमी गुंतवणूक करावी लागेल.

तुम्हाला पेन्शन मासिक, त्रैमासिक, सहामाही अथवा वार्षिक जशी हवी असेल तसा पर्याय निवडावा लागतो. त्यानुसार, तुम्हाला पेन्शनची रक्कम मिळते.

जवळच्या एलआयसी कार्यालयात, एजंट अथवा ऑनलाईनही पॉलिसी खरेदी करता येते. रक्कम जेवढी जास्त गुंतवाल, तेवढी पेन्शन जास्त मिळेल.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.