Mahila Samman Scheme : महिला सन्मान योजनेत मोठी अपडेट! कमी होत आहे वित्तीय तूट

Mahila Samman Scheme : महिलांना बचतीची सवय लावण्यासाठी या आर्थिक वर्षात ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला महिलांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या योजनेसंबंधी ही अपडेट समोर आली आहे.

Mahila Samman Scheme : महिला सन्मान योजनेत मोठी अपडेट! कमी होत आहे वित्तीय तूट
फोटो प्रतिनिधीक
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 10:41 AM

नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : महिलांसाठी केंद्र सरकारने महत्वकांक्षी बचत योजना सुरु केली आहे. महिला सन्मान बचत योजनेची ( Mahila Samman Saving Scheme) घोषणा या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. गेल्या 6-7 महिन्यातच या योजनेने मोठा पल्ला गाठला आहे. या योजनेला भारतातील महिलांनी भरभरुन प्रतिसाद दिला. देशातील महिलांना आर्थिक सक्षमता देण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण योगदान देणार आहे. एक रक्कमी रोखीच्या या योजनेमुळे डब्ब्यातील पैसा खात्यात जमा होतो. त्यावर चांगले व्याज मिळते. महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) या 1 एप्रिल 2023 रोजीपासून सुरु करण्यात आली.या योजनेत महिला वा लहान मुलीच्या नावे 31 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी खाते उघडता येईल. या योजनेसंबंधी अपडेट समोर आली आहे.

काय आहे अपडेट

राष्ट्रीय अल्प बचत योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या गंगाजळीत मोठी रक्कम आली आहे. त्यामुळे महसूलातील तूट भरुन काढण्यासाठी NSSF फायद्याचा ठरला आहे. या योजनेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आर्थिक वर्ष 2023 मधील NSSF चे टार्गेट पुढील वर्षासाठी 4.71 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

असा मिळाला प्रतिसाद

महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजनेला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला. या योजनेत आतापर्यंत 14,83,980 खाती उघडण्यात आली आहे. या योजनेत आतापर्यंत 8,630 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. महिलांनी या योजनेला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला वित्तीय तूट भरुन काढण्यास मदत होत आहे.

असे उघडा खाते

महिला सम्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेचे खाते देशातील कोणत्याही महिलेस अथवा मुलीच्या नावे पालकांना काढता येते. योजनेतंर्गत 31 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी खाते उघडता येईल. या योजनेत गुंतवणूकदारांना एकल प्रकारचे खाते उघडता येईल.पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येईल.

इतकी रक्कम करता येते जमा

या योजनेत गुंतवणूकदारांना 7.5 टक्के निश्चित व्याज देण्यात येते. दोन वर्षांच्या कार्यकाळात, महिला अथवा लहान मुलींच्या नावे दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतविता येईल. कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करता येतील. वार्षिक 7.5 टक्के व्याज तिमाहीत जमा होईल.

या राज्यात सर्वाधिक खाती

या योजनेत सर्वाधिक खाती महाराष्ट्रात उघडण्यात आली आहे. तामिळनाडू हे राज्य दुसऱ्या स्थानवर आहे. तर कर्नाटक हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील महिलांनी आतापर्यंत या योजनेत 1,560 कोटी रुपये जमा केले आहे. 2,96,771 महिलांनी या योजनेतंर्गत गुंतवणूक केली आहे.

'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली
'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली.
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'.
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली.
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला.
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर.
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला.
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज.
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'.
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत.
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?.