Medicines : क्षयरोग, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह यासह इतक्या रोगांवरील औषधं एकदम स्वस्त!

Medicines : दुर्धर आजारांवरील औषधं आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे. .

Medicines : क्षयरोग, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह यासह इतक्या रोगांवरील औषधं एकदम स्वस्त!
औषधं झाली स्वस्तImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 8:18 PM

नवी दिल्ली : जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या गंभीर आजारांशी (Serious Disease) सामना करणाऱ्या रुग्णांसाठी (Patients) गुड न्यूज आहे. केंद्र सरकारने (Central Government) क्षयरोग, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह यासह इतर रोगांवरील औषधांच्या किंमती (Medicine Price) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुर्धर आजारावरील औषधं आता एकदम स्वस्त मिळणार आहेत.

केंद्र सरकारने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार, आता एकूण 384 औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने याविषयीच्या औषधांची यादीच जाहीर केली आहे. राष्ट्रीय अत्यावश्यक औषध सूचीत(NLEM) या औषधांचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे येत्या काही दिवसांत अनेक गंभीर आजारांवरील औषधी एकदम स्वस्तात मिळतील. विशेष बाब म्हणजे यामध्ये पेटंट असलेल्या औषधांचाही समावेश आहे. या निर्णयामुळे औषध उत्पादन कंपन्यांना महागड्या किंमतीत ही औषध विकता येणार नाहीत.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारद्वारे नामनिर्देशीत 384 जीवनावश्यक औषधांचे या महत्वपूर्ण निर्णयामुळे मूल्य निर्धारीत करण्यात आले आहे. केंद्र सरकारने 12 नोव्हेंबर रोजी याविषयीच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना या औषधांचा मोठा साठा करुन ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना यातील काही औषध तर अल्प दरात मिळतीलच पण काही औषध मोफत मिळतील.

या यादीत 34 अतिरिक्त औषधे जोडण्यात आली आहेत. तर 26 औषधे ज्यामध्ये रॅनिटिडाइन, अॅटेनोलॉल आणि मिथाइलडोपा ही काढून टाकण्यात आली आहेत. औषधांची किंमत, आवश्यकता आणि उपलब्धतेनुसार या यादीत जोडली जातात अथवा काढून टाकली जातात.

यादीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या औषधांमध्ये अनेस्थिसियाचं औषध, डोळ्यासंबंधीचं औषध, कॅन्सर, दुखणे, गाठी रोग, हृदयरोगावरील औषधांचा प्रामुख्याने समावेश आहे. तर व्यसन सोडविणारी औषधं, बुप्रेनोरफिन, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, स्ट्रोक यासह इतर अनेक औषधांचा यामध्ये समावेश आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.