Aadhar Card | खबरदार, आधार कार्डचा चुकीचा वापर कराल तर, जमीनजुमला विकून ही नाही करता येणार भरपाई, नवीन नियमानुसार 1 कोटींचा दंड

Aadhar Card | आता आधार कार्डचा चुकीचा वापर तुम्हाला चांगलाच भोवू शकतो. तेव्हा सावधान, जमीनजुमला विकूनही तुम्ही दंडाची रक्कम भरु शकणार नाहीत.

Aadhar Card | खबरदार, आधार कार्डचा चुकीचा वापर कराल तर, जमीनजुमला विकून ही नाही करता येणार भरपाई, नवीन नियमानुसार 1 कोटींचा दंड
गैरवापर केल्यास जबरी दंडImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 5:59 PM

Aadhar Card | तर गड्या हो, रिकामटेकडेपणा कराल तर पार मातीत जाल बरं. बातमीच तशी आहे. आता आधार कार्डचा (Aadhar Card) गैरवापर (Misuse) करणाऱ्यांना सरकारने (Government)चांगलाच दणका दिला आहे. आधार कार्डचा गैरवापर आता भल्याभल्यांना पेलणार नाही. जमीन जुमला, घरदार विकलं तरी असा गैरवापर करणाऱ्यांना दंडाची (Heavy Penalty Imposed) रक्कम भरता येणार नाही. कारण आधार कार्डचा गैरवापर केल्यास एक कोटी रुपयांचा दंड (1 Crore Penalty) भरावा लागणार आहे. आधार कार्ड हा प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. लहानांपासून मोठ्यापर्यंत आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्डचा वापर जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी करावा लागतो. आधारमार्फतच तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ मिळतो. तेव्हा त्याचा गैरवापर कराल तर आता खबरदार, तुम्हाला हा आर्थिक भूर्दंड पेलवणार बिलकूल पेलवणार नाही. नवीन कायद्यानुसार थेट एक कोटी रुपायंचा दंड भरावा लागणार आहे. या कायद्याने तुम्ही दोषी आढळला तर मात्र काही खैर नाही.

तुरुंगवासाची शिक्षा

आधार कार्डमध्ये भारतीय नागरिकाचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि आधार क्रमांक अशी माहिती असते. तसेच त्याचा बायोमेट्रिक डेटाही आधार कार्डवर उपलब्ध असतो. त्याचबरोबर दुसरीकडे देशात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये आधार कार्डचा गैरवापर आणि दुरुपयोग करण्यात आला आहे. मात्र आधार नियमांचे उल्लंघन केल्यास आता नवीन नियमांनुसार, जबर दंडाव्यतिरिक्त तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

असा आहे खास नियम

केंद्र सरकारने 2 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (दंडाचा निर्णय) नियम, UIDAI ((Adjudication of Penalties) Rules 2021 अधिसूचित केले होते. यूआयडीएआयचे नियम लागू करणारा कायदा वर्ष 2019 मध्ये मंजूर केला होता. याअंतर्गत आधार क्रमांक जारी करणाऱ्या अधिकृत प्राधिकरणाला (Unique Identification Authority of India) जर कोणी नियमांचे उल्लंघन करताना, गैरवापर करताना, चुकीच्या उद्देशाने एखाद्याचे नुकसान करताना आढळल्यास, या नियमानुसार, त्याला तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो. प्राधिकरणाने नियुक्त केलेला समायोजन अधिकारी अशी प्रकरणे निकाली काढण्याचे काम करेल. अशा प्रकरणांमध्ये एखादी संस्था दोषी आढळल्यास त्यावर एक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

इतके आधार कार्ड रद्द

आधार कार्ड जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने कठोर पाऊल उचलत देशभरातील तब्बल 5 लाख 98 हजार 999 आधार कार्ड रद्द केले आहेत. जानेवारी 2022 पासून सरकारने 11 संकेतस्थळांना आधार कार्ड सेवा देण्यास बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती नुकतीच दिली. कोणत्याही नागरिकाला आधार कार्डची नोंदणी करण्याचा, कोणाचाही बायोमेट्रिक बदल करण्याचा आणि मोबाइल क्रमांक बदलण्याचा अधिकार आता सरकारकडे आहे, या संकेतस्थळांकडे (Unauthorized Website) नाहीत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.