ESIC : जिल्ह्याजिल्ह्यात स्वस्तात उपचार, मोदी सरकारचा काय आहे मास्टर प्लॅन
ESIC : मोदी सरकारने देशातील इतक्या जिल्ह्यात स्वस्तात उपाचार देण्यासाठी योजना आखली आहे..
नवी दिल्ली : मोदी सरकारने (Modi Government) आरोग्य क्षेत्रात (Health Sector) अमुलाग्र बदल करण्याचा चंग बांधला आहे. आरोग्य विमा योजनेतून (Health Insurance Scheme) लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता कामगारांसाठी आणखी एक मास्टर प्लॅन मोदी सरकार तयार करत आहे. आरोग्य क्षेत्रातच नवीन योजना केंद्र सरकार घेऊन आले आहे. काय आहेत हे उपाय?
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) माध्यमातून कामगारांना स्वस्तात उपचार मिळतो. पण हे रुग्णालये ठराविक ठिकाणीच आहेत. जिथे कामगारांची संख्या जास्त अशा शहरांपुरती ईएसआयसी रुग्णालये आहेत.
पण मोदी सरकारने कामगारांन स्वस्तात उपाचारांसाठी चंग बांधला आहे. सरकारने आता देशभर ESIC रुग्णालये सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील कामगारांना स्वस्तात उपचार घेता येतील.
मोदी सरकार देशातील 744 जिल्ह्यांमध्ये ESIC रुग्णालये सुरु करणार आहे. सरकारने रुग्णालयांचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. ESIC रुग्णालये विस्ताराची मोठी योजना मोदी सरकारने आखली आहे.
स्वस्त आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी ही रुग्णालये बांधण्यात येणार आहेत. याठिकाणी जवळपास सर्वच आजारांचं निदान करण्यात येईल आणि त्यावर उपचाराची सोय असेल.
अर्थव्यवस्थेने गती पकडल्याने सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट 2022 यादरम्यान पेन्शन फंड नियामक प्राधिकरणाकडे 5.81 कोटी नवीन अंशधारक जोडल्या गेले आहेत. हा आकडा उत्साहवर्धक आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय स्थापण्यात येत आहेत.
सध्या देशातील 443 जिल्ह्यात ईएसआयसीची रुग्णालये असून त्याठिकाणी उपचार देण्यात येत आहेत. तर देशातील 148 जिल्ह्यात ईएसआयसी रुग्णालये नाहीत. हा सर्व विचार करता अद्ययावत सुविधा असणारी नवीन ईएसआयसी रुग्णालये स्थापन करण्यात येणार आहेत.