Gold-Silver Price | सोनं खरेदीची संधी अजूनही गेलेली नाही, भारतीय बाजारात किंमती स्थिर, वाचा आजचे भाव
मुंबईत सोन्याचे 22 कॅरेटचे दर 48,000 रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेटचे दर 52,370 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. मागील दहा दिवसांचे सोन्याचे सरासरी दर पाहिले असता बावीस कॅरेट सोन्याचे दर 47,700 ते 48100 रुपये प्रति तोळा या पातळीवरच स्थिर असल्याचे दिसून आले आहे.
औरंगाबाद | सोने खरेदीसाठी पाडव्याचा मुहूर्त चुकला असेल आणि सोने खरेदीची इच्छा (Gold Buying) अपुरी राहिली असेल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. भारतीय सराफा बाजारात मागील आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या किंमती (Gold-silver price) जवळपास स्थिर आहेत. या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत मागील आठवड्यापासून काहीसा चढ-उतार पहायला मिळतोय, मात्र एकंदरीत किंमतीत फार तफावत जाणवत नाही. 7 एप्रिल 2022 रोजी बुधवारीदेखील सोन्याचे दर स्थिर आहेत तर चांदीच्या किंमतीत (Silver Price) अगदी किंचित घसरण दिसून येतेय. देशाची राजधानी दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे दर 52,370 रुपये प्रतितोळा एवढे नोंदले गेले. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोन्याचे 22 कॅरेटचे दर 48,000 रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेटचे दर 52,370 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. मागील दहा दिवसांचे सोन्याचे सरासरी दर पाहिले असता बावीस कॅरेट सोन्याचे दर 47,700 ते 48100 रुपये प्रति तोळा या पातळीवरच स्थिर असल्याचे दिसून आले आहे.
प्रमुख शहरांतील 24 कॅरेट सोन्याचे दर
दिल्ली – 52,370 रुपये प्रतितोळा मुंबई- 52,370 रुपये प्रतितोळा नागपूर- 52,470 रुपये प्रतितोळा पुणे- 52,470 रुपये प्रतितोळा नाशिक- 52,470 रुपये प्रतितोळा औरंगाबाद- 52,480 रुपये प्रतितोळा
प्रमुख शहरांतील 22 कॅरेट सोन्याचे दर
दिल्ली – 48,000 रुपये प्रतितोळा मुंबई- 48,000 रुपये प्रतितोळा नागपूर- 48,100 रुपये प्रतितोळा पुणे- 48,100 रुपये प्रतितोळा नाशिक- 48,100 रुपये प्रतितोळा औरंगाबाद- 48,100 रुपये प्रतितोळा
प्रमुख शहरांतील चांदीचे दर
दिल्ली- 66,300 रुपये प्रति किलो मुंबई- 71,000 रुपये प्रति किलो नागपूर- 66,300 रुपये प्रति किलो पुणे- 66,300 रुपये प्रति किलो नाशिक – 66,300 रुपये प्रति किलो औरंगाबाद- 66,300 रुपये प्रति किलो
999 सोने म्हणजे काय?
22 कॅरेट किंवा 24 कॅरेट असे सोने शुद्धतेचे मापकं आपण ऐकलेली असतात. मात्र 999 शुद्धतेचं सोनं म्हणजे काय असा अनेकदा प्रश्न पडतो. किंवा काही वेबसाइट्सवर 999 सोन्याचे दर एवढे… असं लिहिलेलं असतं. तर 999 सोने म्हणजे सर्वात शुद्ध स्वरुप 24K. म्हणजेच अशा सोन्यात 99.9% सोने आहे, जे इतर कोणत्याही धातूमध्ये मिसळलेले नाही. यानुसार- 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते. 22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते. 21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते. 18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते. 14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.
इतर बातम्या-