Firecrackers : हा कोंबडा बांगच देत नाही, तर याच्या आवाजानेच परिसर दणाणतो..हा मुर्गा आहे तरी कोणाचा?
Firecrackers : दिवाळी आली की या कोंबड्याची सर्वांनाच आठवण येते, नेमके काय आहे याच्या आवाजात..
नवी दिल्ली : दिवाळी (Diwali) आली की या कोंबड्याची आपल्या सर्वांनाच आठवण येते. आपल्या अगोदरच्या पिढीने (Generation) ही या कोंबड्याची जादू अनुभवली आहे. हा केवळ बांग देतो वा आरवतो असे नाही तर दणक्यात आवाज करतो. त्याचा आवाज कानठळ्या बसवतो..
तर मंडळी तुम्हाला अंदाज आला असेल, आम्ही बोलत आहोत ते फटक्यांबद्दल. दिवाळीत फटक्यांचा धूमधडाम आवाज रात्रभर आणि भल्यापहाटे ऐकू येतो. फटाके फुटत असतात. आता मोठ्या प्रमाणात फटाके फुटत असल्याने प्रदुषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तर दिवाळीला आपल्याला मुर्गा छाप फटाके (Murga Chhap Pataka) हमखास नजरेस पडतात. या फटाक्यांअभावी दिवाळी अपूर्ण वाटते. अनेकदा बाजारात गेल्यावर फटाक्यांमध्ये एकतरी फटका मुर्गा छाप असतोच असतो.
जगात सर्वाधिक फटाके तयार करण्यात चीनचा पहिला क्रमांक लागतो. तर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा नंबर येतो. भारतात सर्वाधिक फटाके हे शिवाकाशी येथे तयार होतात. शिवाकाशी येथे 800 हून अधिक फटाके उद्योग आहेत.
शिवकाशीत देशातील सर्वाधिक फटाके उत्पादन होते. शिवकाशी देशातील 80 टक्के फटाके निर्मिती करते. याठिकाणी अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या फटाक्यांची निर्मिती होते. याठिकाणी मुर्गा छाप हा ब्रँडही तयार होतो.
मात्र प्रदुषणाचा प्रश्न उपस्थित होत असल्याने फटाक्यांचा वापर कमी कमी होत आहे. तर काही फटक्यांवर बंदी घालण्यात आल्याने त्याची निर्मिती करणारे उद्योग शिवकाशीत बंद पडले आहेत. त्यामुळे अनेकांचे रोजगारही गेले आहेत.
फटक्यांच्या आवाजावर ही कारवाईचा बडगा उगारल्या जात आहे. तर जास्त आवाजाचे फटाके तरुणांव्यतिरिक्त फार कमी लोक वाजवित आहेत. तसेच आवाजामुळे अनेकांना त्रास होत असल्याने हे फटाके खरेदी न करण्याकडेही लोकांचा कल वाढला आहे. त्याचाही परिणाम मुर्गा छाप अथवा इतर कंपन्यांच्या फटक्यांच्या विक्रीवर होत आहे.