इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी लोन हवंय? चिंता सोडा, SBI कडून ग्राहकांसाठी खास ऑफर

इलेक्ट्रिक वाहन खरेदीचे अनेक फायदे आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषणाला तर आळा बसतोच सोबतच इंधनाच्या खर्चामध्ये देखील मोठी बचत होते. मात्र इलेक्ट्रिक वाहने हे तुलनेने सध्या पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा महाग आहेत. मात्र तुम्हाला जर इलेक्ट्रिक वाहनाची खरेदी करायची असेल तर काळजी करू नका, सध्या विविध बँका इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी ऑफर देत आहेत.

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी लोन हवंय? चिंता सोडा, SBI कडून ग्राहकांसाठी खास ऑफर
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 9:00 AM

सध्या देशात पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol and diesel price) गगनाला भिडले आहेत. इंधनाच्या किमती सातत्याने वाढतच आहेत. अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनावर वाहन चालवणे बजेटच्या बाहेर गेले आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही इलेक्ट्रिक वाहन (Electric vehicle) खरेदीचा विचार करू शकता. इलेक्ट्रिक वाहन खरेदीचे अनेक फायदे आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषणाला तर आळा बसतोच सोबतच इंधनाच्या खर्चामध्ये देखील मोठी बचत होते. मात्र इलेक्ट्रिक वाहने हे तुलनेने सध्या पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा महाग आहेत. मात्र तुम्हाला जर इलेक्ट्रिक वाहनाची खरेदी करायची असेल तर काळजी करू नका, सध्या विविध बँका इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी ऑफर देत आहेत. अशीच एक ऑफर सध्या आपल्या ग्राहकांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) कडून देण्यात येत आहे. या ऑफरचा फायदा असा की, या ऑफरमुळे कमी ईएमआयमध्ये तुमचे इलेक्ट्रिक वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. चला तर जाणून घेऊयात बँकेच्या या ऑफरबाबत

काय आहे ऑफर?

एसबीआयकडून इलेट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर देण्यात आली आहे. त्यांना वाहन कर्जावर 20 बेसीस पॉइंटची अतिरिक्त सूट मिळणार आहे. सोबतच कर्जाची संपूर्ण प्रोसेसिंग फी देखील माफ करण्यात येणार आहे. तसचे जर तुम्हाला कमीत कमी ईएमआयचे हफ्ते भरायचे असतील तर बँक तुम्हाला आठ वर्षांत संपूर्ण कर्जफेडीची सुविधा देखील उपलब्ध करून देत आहे. तुम्ही जर लवकरात लवकर ईएमआयचे हफ्ते भरले तर कर्जावर भराव्या लागणाऱ्या व्याजात देखील बचत होऊ शकते. तुम्ही आठ वर्षापूर्वी देखील बँकेचे संपूर्ण लोन परतफेड करू शकता.

लोनसाठी काय आहेत अटी?

एसबीआयकडून इलेक्ट्रिक वाहनावर लोन घेण्यासाठी संबंधित कर्जदाराचे वय कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 67 वर्षांपर्यंत असावे. एसबीआयकडून हे लोन व्यवसायिक, सरकारी कर्मचारी किंवा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफर करण्यात येत आहे. थोडक्यात काय तर तुमचा पगार हा बँकेच्या नियमात बसायला हवा तरच तुम्हाला लोन मिळू शकते. ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखांच्या वर आहे, असे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकता. बँकेने विचारणा केलेल्या आवश्यक डॉक्युमेंटची पुर्तता केल्यानंतर तुम्हाला इलक्ट्रिक वाहन खरेदीसाठी कर्ज मिळू शकते.

संबंधित बातम्या

इंधनाचे नवे दर जारी, सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये; जाणून घ्या राज्याच्या प्रमुख शहरातील दर

इंडोनेशियामध्ये Palm Oil चा तुटवडा; …तर भारतामध्ये खाद्यतेलाचे दर आणखी वाढणार

क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी चेक का करावा? जाणून घ्या क्रेडिट रिपोर्ट चेक करण्याचे फायदे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.