आधार कार्डशी संबंधित व्यवहारांवर मर्यादा, Micro ATM आणि POS मशीन वर दिवसातून 5 वेळा काढता येणार रक्कम
AePS Transaction: एईपीएसशी जोडलेल्या मायक्रो एटीएम अथवा पीओएस मशीनवर ग्राहकाला दिवसातून जास्तीत जास्त 5 वेळा रोख रक्कम काढता येईल. या व्यवहारांसाठी बँक खाते क्रमांकाची आवश्यकता नसते. मशीनवर बोटांचा ठसा(Thumb Impression) उमटविला तर ग्राहकाला रक्कम काढता येते.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPSI) आधारशी संबंधित व्यवहारांसाठी (AePS Transaction) मर्यादा निश्चित केली आहे. आता ग्राहकाला आधार संचालित पेमेंट यंत्रणेतून दिवसभरात मोजक्या व्यवहाराची मर्यादा घालून देण्यात आली आहे. यापूर्वी व्यवहाराची मर्यादा ५०,००० रुपये निश्चित करण्यात आली होती, त्यानंतर या नव्या नियमाची भर पडली आहे. मायक्रो एटीएम (Micro ATM) किंवा पीओएस मशीन (POS) सारख्या आधार संचालित मशीनद्वारे लोकांना त्यांच्या रोख गरजा पूर्ण करणे शक्य झाल्याने कोरोना कालावधीत आधार(Adhar Card Transaction) व्यवहारांची सुविधा खूप वेगाने वाढली आहे.
एनपीसीआयने आधारकार्ड मार्फत रोख रक्कम काढणे आणि मिनी स्टेटमेंटची मर्यादा निश्चित केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आधार (बँक सुविधा एजन्सी) आणि ग्राहकांकडून मायक्रो एटीएम किंवा पीओएस मशीन चालविणाऱ्या बँका यांना या नव्या नियमानुसार
दररोज प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त 5 वेळा रोख रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.
5 वेळा काढा रोख रक्कम
प्रत्येक ग्राहकाला दरमहा किमान 5 वेळा रोख रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.
तसेच एटीएम किंवा पीओएस मशीनमधून किमान 5 वेळा मिनी स्टेटमेंट उपलब्ध होतील. एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, हे संबंधित नियम १५ जानेवारी २०२२ रोजी पासून लागू होतील. हा व्यवहार आधार सक्षम पेमेंट सिस्टीम किंवा एनपीसीआयने विकसित केलेल्या ईपीएसद्वारे केला जाईल . एईपीएस ही एक प्रणाली आहे जी ग्राहकांना त्यांचा आधार क्रमांक आणि त्यांचे बोटांचा ठसे किंवा आयरिस स्कॅन यांचा पडताळा करून मायक्रो एटीएम किंवा पीओएस मशीनमधून रक्कम काढण्याची मूभा देते
5 मिनी स्टेटमेंट काढता येतील
Businessline.com च्या अहवालानुसार जर व्यवसाय प्रतिनिधी, एजंट आणि व्यापारी यांच्या माध्यमातून आधारद्वारे पैसे काढले गेले तर ग्राहकाला दुहेरी पडताळा करणे आवश्यक आहे. यासाठी आधार बायोमेट्रिक पडताळणीचा वापर केला जाईल. एनपीसीआयने मार्च 2021 मध्ये बँकांना एका महिन्यात प्रत्येक ग्राहकामागे 5 मिनी स्टेटमेंटचा नियम लागू केले होते. 5 वेळा, जर ग्राहकाला मिनी स्टेटमेंट हवे असेल, तर एकतर बँक नकार देते किंवा अतिरिक्त शुल्क आकारते. आधार व्यवहारांशी संबंधित अनेक मोठ्या बँकांनी प्रत्येक ग्राहकामागे रोख रक्कम काढण्यासाठी ही मर्यादा निश्चित केली आहे.
एईपीएस व्यवहार म्हणजे काय
कोणत्याही एपीएसशी जोडलेल्या मायक्रो एटीएममधून ग्राहक प्रत्येक व्यवहारामागे 10,000 रुपयांपर्यंत रोख रक्कम काढू शकतो. कोविड-19 एईपीएसमधून रोख रक्कम काढण्याची प्रथा वेगाने वाढली आहे. डिसेंबर 2021 मध्ये एईपीएसच्या माध्यमातून 9.6 व्यवहार करण्यात आले जेथे 25,860.92 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. ज्या बँक खात्याशी आधार या सुविधेशी जोडलेला आहे, त्या खात्यातून पैसे काढले जातात. आधारशी संबंधित व्यवहारासाठी बँक खाते क्रमांकाची आवश्यकता नसते. आधार क्रमांक लोकांना एका बँकेतून दुसऱ्य बँकेत पैसे पाठविण्याची किंवा पैसे मिळविण्याची परवानगी देतो. या व्यवहारासाठी खातेदाराला फक्त त्याचे बोटांचे ठसे द्यावे लागतात.