Education : मुलीचं नाही तर अंबानी कुटुंबातील सूनांचाही शिक्षणात डंका! मोठ्या सुनेची पदवी ऐकून कराल कौतुक..

Education : अंबानींच्या घरात लक्ष्मीच नाही तर सरस्वतीचीही पूजा होते..

Education : मुलीचं नाही तर अंबानी कुटुंबातील सूनांचाही शिक्षणात डंका! मोठ्या सुनेची पदवी ऐकून कराल कौतुक..
श्रीमंतीच नाही तर शिक्षणातही प्रगतीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 10:43 PM

नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या श्रीमंत कुटुंबाबाबत (Richest Family) प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते. या कुटुंबातील प्रत्येक सदस्याबाबत प्रत्येकाला माहिती जाणून घ्यायची आहे. तर आपण अंबानी कुटुंबातील (Ambani Family) सूनांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जाणून घेऊयात. शिक्षणातील (Educational) त्यांची प्रगती पाहून तुम्हाला ही कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला यातून प्रेरणा नक्कीच मिळेल.

मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी, अनिल अंबानीची पत्नी टीना अंबानी आणि आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता यांचा शैक्षणिक आलेख आपण पाहणार आहोत. श्रीमंती बाबत हे कुटुंब तर जगविख्यात आहे. पण सूनांचे शिक्षण ऐकून तुम्हाला धक्का नक्कीच बसेल .

मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी वाणिज्य पदवी पूर्ण केली आहे. त्यांना भरतनाट्यमही येते. लग्नापूर्वी नीता अंबानी या शिक्षिका होत्या. आज त्या अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीन आहेत.

हे सुद्धा वाचा

मुकेश अंबानी यांचे छोटे बंधू अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांची एक ओळख आहे. त्यांनी मुंबईतील एम एम प्युपिल्स शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी जय हिंद महाविद्यालयातून कला शाखेत पदवी मिळवली आहे. 1975 साली त्यांनी फेमिना टीन प्रिंसेस ऑफ इंडियाचा किताब पटकावला होता.

आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता यांचे शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून झाले आहे. त्यानंतर पदवीसाठी श्लोका अमेरिका गेल्या. त्यांनी प्रिंस्टन विद्यापीठातून अँथ्रोपोलॉजीमध्ये पदवी संपादन केली.

तर लंडन येथील स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये त्यांनी राज्यशास्त्र विषयात शिक्षण पूर्ण केले आहे. एवढ्यावरच न थांबता श्लोका यांनी कायद्या क्षेत्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. विधी शाखेत त्यांनी पदवीत्युर शिक्षणही घेतले आहे.

तर राधिका मर्चेंट अजून अंबानींच्या कुटुंबातील सदस्य झालेली नाही. पण ती अनंत अंबानी आणि अंबानी कुटुंबातील जवळची व्यक्ती मानण्यात येते. वृत्तानुसार, ती लवकरच या कुटुंबाची सून होणार आहे. कॅथेड्रल अँड जॉन केनेन आणि इकोल मोडिएल वर्ल्ड शाळेतून तिने शिक्षण पूर्ण केले आहे.

राधिकाने न्यूयॉर्क विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदवी मिळविली आहे. राधिका सध्या त्यांच्या वडिलांचा व्यवसाय, ADF फूड्स लिमिटेड आणि एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे काम पाहत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.