Republic Day Tickets : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास लावा हजेरी! Republic Day Parade चे तिकीट एका क्लिकवर

Republic Day Tickets : दिल्लीतील रोमहर्षक सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी तुम्हालाही आहे.

Republic Day Tickets : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास लावा हजेरी! Republic Day Parade चे तिकीट एका क्लिकवर
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 8:06 PM

नवी दिल्ली : देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2023) सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी चालून आली आहे. हा सोहळा आता तोंडावर येऊन ठेपला आहे. अवघ्या दोन आठवड्यानंतर दिल्लीत हा रोमहर्षक सोहळा पार पडेल. स्वातंत्र्य दिनानंतरच्या (Independent Day) या सर्वात मोठ्या पर्वात देशातील कानाकोपऱ्यातून लोक सहभागी होतात. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याचा जीवंतपणा तुम्हाला ही अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमाची तिकीट तुम्हाला सहज नोंदविता येतात. तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन ऑनलाईन पद्धतीने (Online Ticket) ही तिकीट बुक करु शकता.

नागरिकांना हा सोहळा याची देही याची डोळा साठविता यावा यासाठी संरक्षण मंत्रालयाने आमंत्रण पोर्टल सुरु केले आहे. संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी 6 जानेवारी 2023 रोजी या पोर्टलचे उद्धघाटन केले. त्यामुळे नागरिकांना आता थेट तिकीट बुकिंग करता येणार आहे.

www.aamantran.mod.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना तिकिटाची नोंदणी करता येणार आहे. या संकेतस्थळावर स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचे तिकीट बुक करता येणार आहे. त्यामुळे ऐनवेळी तिकीटासाठी त्यांना कुठलीही धावपळ करण्याची गरज नाही.

हे सुद्धा वाचा

या पोर्टलमुळे प्रजासत्ताक दिवशीच्या कार्यक्रमाचे तिकीट खरेदी करणे सोपे होणार आहे. तसेच तिकीट खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लागणारा खर्चही कमी झाला आहे. या पोर्टलमुळे सुरक्षा व्यवस्थेविषयीचा चिंताही कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी तिकीट बुक करण्यासाठी सर्वात अगोदर aamantran.mod.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. त्यासाठी तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल. त्यानंतरच पुढे जाता येईल.

या संकेतस्थळावर नागरिकांना त्यांची संपूर्ण माहिती नोंदवावी लागेल. यामध्ये त्याचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, घराचा संपूर्ण पत्ता टाकावा लागेल. कॅप्चा कोड टाकून ओटीपी रिक्वेस्ट द्यावी लागेल. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल.

मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक संबंधित संकेतस्थळाच्या पर्यायमध्ये नोंदवावा लागेल. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्याठिकाणी तिकीटाची श्रेणी निवडावी लागेल. त्यातील तिकीट तुम्हाला खरेदी करता येईल. त्यानंतर ऑनलाई पेमेंट करता येईल.

त्यानंतर लागलीच ई-तिकीट येईल. हे तिकीट डाऊनलोड करुन मोबाईलमध्ये सेव्ह करुन घ्या. एका व्यक्तीला जास्तीत जास्त 10 तिकीट खरेदी करता येतील. तिकीट खरेदीसाठी तुम्हाला घाई करावी लागेल. कारण मर्यादीत काळासाठीच तिकीटांची विक्री होते.

आमंत्रण पोर्टलवर तुम्हाला केवळ 24 जानेवारी पर्यंत तिकीट बुक करता येणार आहे. या समारंभात सहभागी होण्याच्या दिवशी तुमच्याकडे सर्व मुळ आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला प्रवेश नाकारण्यात येऊ शकतो. तिकीट बुक केल्यानंतर ते रद्द वा हस्तांतरीत करता येत नाही.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.