Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Illegal Loan App | कर्जाच्या नावाखाली लूट करणाऱ्या कंपन्या होणार चारीमुंड्या चीत , RBI चा प्लॅन तयार..

Illegal Loan App | भारतात अवैध कर्ज देणाऱ्या अॅपचा सुळसुळाट झाला आहे. ग्राहकांना लुटण्याचा धंदा जोरात सुरु आहे. त्यांना वेसण घालण्यासाठी मध्यवर्ती बँकेने प्लॅन तयार केला आहे.

Illegal Loan App | कर्जाच्या नावाखाली लूट करणाऱ्या कंपन्या होणार चारीमुंड्या चीत , RBI चा प्लॅन तयार..
बोगस कर्जदार अॅपवर लवकरच कारवाईImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 6:20 PM

Illegal Loan App | ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) प्रकारही खूप वाढले आहेत. भारतात अवैध कर्ज देणाऱ्या अॅपचा (Illegal Loan App)सुळसुळाट झाला आहे. ग्राहकांना लुटण्याचा धंदा जोरात सुरु आहे. त्यांना वेसण घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) प्लॅन तयार केला आहे.

अवैध अॅप तयार करुन कर्जाच्या नावाखाली सर्रास जनतेची लूट करण्यात येत आहे. कमी व्याजदराच्या आमिषाने ग्राहकांना जाळण्यात ओढण्यात येते. काही तर प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली रक्कम हडप करुन पोबारा करतात.

काही अॅप आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून लूट करतात. हे अॅप वसूलीसाठी तगादा लावतात. दमदाटी करतात. त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येच्या घटना ही वाढल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

अनेक डिजिटल कर्ज देणारी अॅपची रिझर्व्ह बँकेकडे नोंदच नाही. हे अॅप स्वतःच सर्व प्रक्रिया पूर्ण करतात. ही ऑनलाईन सावकारी म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी RBI ने एक योजना तयार केली आहे. त्यानुसार, बँक डिजिटल कर्ज देणाऱ्या अॅपची यादी तयार करणार आहे. प्ले स्टोअरवर या अॅपच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MEITY) त्यांच्यावर लक्ष ठेवले. त्यांच्या कार्यपद्धतीचे विश्लेषण करेल. आरबीआय ही या अॅपवर लक्ष ठेवणार आहे. गैर बँकिंग वित्तीय संस्थांच्या कारभारावरही वॉच असेल.

ऑनलाईन कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांची नोंदणी एका ठराविक कालावधीत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याद्वारे त्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यात येईल.

तर जे कर्ज देणारे अॅप नोंदणी करणार नाहीत. त्यांना प्ले स्टोअरवरही काम करता येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. तर कॉर्पोरेट मंत्रालयाचा परवानगी दिलेल्या अॅपवर वॉच असेल.

सरकारने डिजिटल कर्ज अॅपमार्फत होणाऱ्या लुटीवर, फसवणुकीवर चिंता व्यक्त केली होती. तसेच यावर तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.