Income Tax Notice : काय सांगता, कारनामा मित्राचा अन् नोटीस तुम्हाला!

Income Tax Notice : कधी कधी मित्र पण गोत्यात आणू शकतो. अर्थात हे काही मुद्दाम केलेले नसेल, पण त्याचा कारनामा, तुमच्या डोक्याला ताप देणारा ठरेल.

Income Tax Notice : काय सांगता, कारनामा मित्राचा अन् नोटीस तुम्हाला!
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 8:21 PM

नवी दिल्ली : आयकर विभागाकडून नोटीस (Income Tax Notice) मिळणे ही तशी सर्वमान्य बाब आहे. पण काही वेळा आयकर खाते तुम्हाला अशा व्यवहारावर नोटीस पाठवते, ज्यात तुमचा काहीच हात नसतो. हा व्यवहार तुम्ही केलेला नसतो, तरी पण या व्यवहाराविषयी तुमच्याकडे चौकशी होऊ शकते. पण यात घाबरण्यासारखं काहीच नाही. तुम्हाला घाम फुटण्याची ही गरज नाही. गुंतवणूक, कर तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही अडचणीतून मार्ग निघू शकतो. त्यातच तुमची काही चूक नसेल मग तर बिनधास्त रहा. चौकशीला सामोरं जा.

मित्राचा कारनामा, ताप तुम्हाला एखाद्या प्रकरणात मित्राच्या व्यवहाराबाबत तुम्हाला नोटीस येऊ शकते. आयकर खाते या नोटीसमध्ये तुम्हाला त्याच्या व्यवहाराविषयी माहिती मागू शकते. या प्रकरणाशी तुमचा काहीच संबंध नसेल. या व्यवहारात तुमचे देणे-घेणे नसले तरीही आयकर खात्याची नोटीस मिळेल.

तर मोठा दंड जर मित्राच्या व्यवहारात तुमचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आला तर आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवेल. कलम 153 C अंतर्गत प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार म्हणून तुमच्याकडे या व्यवहाराची चौकशी करण्यात येते. विभाग तुम्हाला या कलमातंर्गत बोलवू शकते. जर या व्यवहारात तुमचा सहभाग असेल आणि तुम्ही चौकशीत सहकार्य केले नाही तर 10,000 रुपयांपर्यंत दंड ठोठाविण्यात येतो. इतकेच नाही, जर व्यवहाराविषयी साशंकता असेल तर कलम 133(6) अंतर्गत कंपनीकडे अथवा बँकेकडे आयटी खाते विचारपूस करु शकते.

हे सुद्धा वाचा

असा ही बसतो फटका परस्पर बँक खात्यातून व्यवहार करण्याच्या अनेक घटना देशात घडल्या आहेत, घडतात. म्हणजे एखाद्या खात्यात तुमचे खाते आहे. ते वापरात नाही. पण सायबर भामट्यांनी दुसऱ्या एखाद्या खात्यातील रक्कम चोरुन ती तुमच्या खात्यात टाकली आणि त्याआधारे तिसऱ्याच खात्यात ती वळती केली तर, तुमचे बँक खाते रडारवर येत. आता या व्यवहाराची तुम्हाला काहीच माहिती नसते. पण तुमच्या खात्याचा वापर झाल्याने प्राप्तिकर खात्याची तुम्हाला नोटीस मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला चौकशीत याविषयीची माहिती द्यावी लागेल.

नवीन कर प्रणाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी जुन्या कर प्रणालीसोबतच करदात्यांसाठी नवीन कर प्रणालीची ओळख करुन दिली. विशेष म्हणजे या नवीन कर प्रणालीत करदात्यांना 7 लाख उत्पन्नांवर छद्दाम पण देण्याची गरज नाही. पण गुंतवणुकीवरील सवलतीसाठी तुम्हाला जुन्या कर प्रणालीचा आधार घेता येईल.

आयटीआर फॉर्म जुन्या आणि नवीन कर प्रणालीत स्विच करण्यासाठी ITR-1 आणि ITR-4 मध्ये काही बदल करण्यात आले आहे. आयटीआर दाखल करताना अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे. गेल्या आर्थिक वर्षांत, व्यापारात 60 लाखांहून अधिकची उलाढाल, व्यावसायिक दृष्ट्या गेल्या आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांहून अधिकची उलाढाल झाली असेल तर गेल्या आर्थिक वर्षात तुमच्याकडून टीडीएस कपात करण्यात येईल.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.