ATM मधून रक्कम काढायचीये? ई-वॉलेट आहे ना दिमतीला; नवीन डिजिटल UPI कार्ड दिमाखात दाखल
ओमनीकार्डच्या वापरकर्त्यांना कोणत्याही बँकेच्या एटीएममधून डिजिटल वॉलेटच्या सहाय्याने सहजरित्या रक्कम काढता येणार आहे. म्हणजे तुमच्या मोबाईल फोनमध्ये ई-वॉलेट असेल आणि तुम्ही ओमनीकार्डचे ग्राहक असाल तर एटीएमवर विना डेबिट कार्ड तुम्ही रक्कम काढू शकता. युपीआय आधारीत ही व्यवस्था आहे.
पेमेंट कंपनी ओमनीकार्डने (OmniCard) रविवारी एटीएममधून (ATM) रक्कम काढण्यासाठी नवीन सुविधा सुरु केली आहे. या सेवेच्या माध्यमातून कोणत्याही एटीएममधून ई-वॉलेटच्या(E-wallet) सहाय्याने रक्कम सहज काढता येईल. ही सुविधा तशीच असेल ज्याविषयी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आताच घोषणा केली होती. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) अशातच जाहीर केले होते की, बँकांना आता एकात्मिक भरणा पद्धतीने (unified payment interface-UPI) रक्कम काढण्याची सुविधा देता येईल. यामध्ये एटीएममध्ये कोणतेही डेबिट कार्डचा वापर करण्याची गरज राहणार नाही. या पद्धतीमुळे ग्राहकांना विना कार्ड रक्कम काढणे सोपे जाईल. ओमनीकार्डने ही सुविधा सुरु केली आहे. ही सुविधा प्रीपेड इंस्ट्रुमेंटच्या आधारावर असेल.कंपनीच्या दाव्यानुसार, आरबीआयकड़ून अशा प्रकारे परवाना प्राप्त ती पहिली कंपनी आहे. ओमनीकार्डच्या या सेवेमुळे ग्राहकाला रुपे पावर्ड कार्डमुळे देशाच्या कोणत्याही एटीएममधून रक्कम काढता येईल. सध्या रिझर्व्ह बँकेने नॉन बँकिंग कंपन्यांसाठी डिजिटल वॉलेटमधून रक्कम काढण्याची सुविधा दिली आहे. यापूर्वी ही सुविधा बँकांपुरतीच मर्यादीत होती. आता यामध्ये गैर-बँकिंग कंपन्यांचा ही समावेश झाला आहे. ओमनीकार्डचे वापरकर्ते कोणत्याही बँकेच्या एटीएममधून डिजिटल वॉलेटच्या सहायाने रक्कम काढू शकतील. जर तुमच्या मोबाईलमध्ये ई-वॉलेट असेल आणि तुम्ही ओमनीकार्डचे वापरकर्ते असाल तर एटीएमवर विना कार्ड रक्कम काढता येईल.
हे आहेत फायदे राजेहो
ई-वॉलेटच्या सहाय्याने रक्कम काढण्याचा मोठा फायदा म्हणजे तुम्ही एटीएमवरील सायबर धोक्याचे शिकार होणार नाहीत. कार्ड चोरी जाणे, कार्डचे क्लोनिंग, एटीएमवरील धोकाधडी या सर्व कटकटीतून तुमची सूटका होईल. तसेच ऑनलॉईन खरेदी करताना अनेक कंपन्या तुमच्या कार्डची माहिती घेतात. तोही धोका यामुळे टळेल. या प्रक्रियेत अनेक सुरक्षेच्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. परिणामी ग्राहकाला कोणत्याही एटीएममधून सहज रक्कम काढता येते. वापरकर्ते त्यांच्या मोबाईलमधून काही सेंकदातच रुपे पावर्ड डिजिटल कार्ड तयार करु शकतील आणि एटीएम मशीनवरील क्यू-आर कोडला स्कॅन करुन रक्कम काढू शकतील. एवढेच नाहीतर शॉपिंग आणि खरेदी करताना क्यू-आर कोडचा वापर करुन रक्कम अदा करु शकतील.
मोबाईल अॅपच्या माध्यमातून काढा रक्कम
ओमनीकार्ड वापरकर्त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी अनेक कार्ड तयार करता येतील. पेमेंट ही त्यांना ट्रॅक करता येईल. तसेच दिवसाकाठी केलेल्या खर्चाची इत्यंभूत माहिती ही त्यांना प्राप्त होईल. वापरकर्त्याला त्याच्या बचत खात्यावर आधारीत डेबिट कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही. मोबाईल फोनमधील डिजिटल कार्डचा वापर करुन त्याला पेमेंट देता येईल. हे डिजिटल कार्ड रुपे कार्ड आणि युपीआयसोबत लिंक असेल. परिणामी ग्राहक कोणत्याही ऑनलाईन फ्रॉडला बळी पडणार नाही.