मुलीच्या नावे दररोज केवळ 125 रुपये करा जमा, लग्नाच्या वेळी एकरकमी मिळतील 27 लाख रुपये
एलआयसीची ही पॉलिसी कमी आणि उच्च उत्पन्न असणार्या लोकांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये भांडवलाची सुरक्षितता निश्चित उत्पन्नासह मिळण्याची हमी असते. यात दररोज 125 रुपये जमा केल्यावर आपल्याला 27 लाख रुपये मिळतील.
नवी दिल्ली : जीवन विमा महामंडळाची कन्यादान पॉलिसी(LIC Kanyadan Policy) ही मुलींसाठी एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. मुलींचे शिक्षण आणि लग्नासाठी पालकांना बचतीचे साधन प्रदान करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. वास्तविक ही एलआयसीच्या जीवन लक्ष्य योजने(Jeevan Lakshya Scheme)चे कस्टमाईज व्हर्जन आहे, परंतु कंपनीचे एजंट हे कन्यादान पॉलिसीच्या नावाखाली विकतात. (Only Rs 125 per day deposit in the name of the girl, will get a lump sum of Rs 27 lakh at the time of marriage)
एलआयसीची ही पॉलिसी कमी आणि उच्च उत्पन्न असणार्या लोकांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये भांडवलाची सुरक्षितता निश्चित उत्पन्नासह मिळण्याची हमी असते. यात दररोज 125 रुपये जमा केल्यावर आपल्याला 27 लाख रुपये मिळतील. या पॉलिसीबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही योजना 25 वर्षांसाठी आहे, परंतु आपल्याला प्रीमियम फक्त 22 वर्षांसाठी भरावा लागेल. पॉलिसी सुरु असताना विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला कोणतेही प्रीमियम द्यावे लागणार नाहीत. त्याचबरोबर, पॉलिसीच्या उर्वरित वर्षांत मुलीला दरवर्षी सम अॅश्युअर्डमधील 10 टक्के रक्कम मिळेल.
वडिलांच्या निधनानंतरही ही योजना विनामूल्य सुरू राहणार
जीवन लक्ष्य योजनेअंतर्गत पॉलिसी सुरू झाल्यानंतर पॉलिसीचे लक्ष्य संपत नाही. हेच कारण आहे की विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला कोणतेही प्रीमियम द्यावे लागणार नाहीत. त्याचबरोबर, पॉलिसीच्या उर्वरित वर्षांत मुलीला दरवर्षी सम अॅश्युअर्डमधील 10 टक्के रक्कम मिळते.
पॉलिसीची मुदत 13-25 वर्षे
या योजनेसाठी पॉलिसीची मुदत 13-25 वर्षे आहे. प्रीमियम मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर जमा केले जाऊ शकते. पात्रतेबद्दल बोलताना, यासाठी किमान प्रवेश वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त प्रवेश वय 50 वर्षे आहे. कमाल मॅच्युरिटी वय 65 वर्षे आहे.
पॉलिसीच्या मुदतीपेक्षा प्रीमियम पेमेंट टर्म तीन वर्षांपेक्षा कमी
प्रीमियम पेमेंट टर्मबद्दल बोलायचे तर पॉलिसीच्या मुदतीपेक्षा ते 3 वर्षांपेक्षा कमी असते. यासह एलआयसी दोन प्रकारचे रायडर ऑफर करते – अपघाती मृत्यू आणि अपंगत्व रायडर. दुसरा राइडर म्हणजे न्यू टर्म अॅश्युरन्स राइडर.
दोन वर्षानंतर कर्जाची सुविधा
मॅच्युरिटी बेनिफिटबद्दल सांगायचे तर पॉलिसीधारकाच्या हयातीत, तुम्हाला सम अॅश्युर्ड तसेच सिंपल रिव्हिजनरी बोनसचा लाभ मिळेल. याशिवाय अतिरिक्त बोनसचा लाभही उपलब्ध आहे. याशिवाय पॉलिसीची दोन वर्षे पूर्ण झाल्यावर कर्जाचा लाभदेखील उपलब्ध आहे.
कर लाभ
या पॉलिसीच्या प्रीमियमच्या पेमेंटवर 80 सी अंतर्गत कपात करण्याचा फायदा उपलब्ध आहे. कलम 10 डी अंतर्गत मॅच्युरिटी रक्कम करमुक्त आहे.
मासिक प्रीमियम 1842 वर मिळतील 13.50 लाख रुपये
जर ए पॉलिसीधारक असेल ज्यांचे वय 30 वर्षे असेल आणि त्याने 5 लाख रुपयांचा विमा रक्कम खरेदी केला असेल आणि पॉलिसीची मुदत 25 वर्षे असेल तर त्यासाठी प्रीमियम भरण्याची मुदत 22 वर्षे असेल. अपघाती रायडर आणि कर यासह त्याचा मासिक प्रीमियम 1842 रुपये, तिमाही प्रीमियम 5526 रुपये, सहामाही प्रीमियम 10934 रुपये आणि वार्षिक प्रीमियम 21634 रुपये असेल. सर्व प्रीमियम रक्कम रायडर आणि टॅक्ससहित असते. 22 वर्षांत तो प्रीमियम स्वरुपात सुमारे 4.60 लाख जमा करेल आणि मॅच्युरिटीला एकूण 13.50 लाख रुपये मिळतील. यात 5 लाखांची विमा रक्कम आहे, रिविजनरी बोनस 6.20 लाख आणि अतिरिक्त बोनस 2.25 लाखांच्या आसपास आहे. जर ए 10 लाखांची विमाराशी रक्कम घेत असेल तर अपघाती लाभधारकांसह वार्षिक प्रीमियम 43011 रुपये, सहामाही प्रीमियम 21738 रुपये आणि तिमाही प्रीमियम 10986 रुपये असेल. मासिक प्रीमियम 3663 रुपये असेल. (Only Rs 125 per day deposit in the name of the girl, will get a lump sum of Rs 27 lakh at the time of marriage)
Chiplun Flood | चिपळूणच्या अपरांत कोविड सेंटरमध्ये पुराचं पाणी, 8 जणांचा मृत्यूhttps://t.co/9YkDk5iSNR#Chilpun #Flood #MaharashtraFloods #CovidCenter
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 23, 2021
इतर बातम्या
Yamaha ची सर्वात स्वस्त Scooter लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
‘या’ कामासाठी कॅनरा बँकेने सुरू केले स्वतंत्र अॅप, ग्राहकांना बँकेत जाण्याची आवश्यकता नाही