PAN Aadhaar Linking: पॅनकार्डला आधार लिंक करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या शेवटची तारीख

आता नोकरदारांना या दोन्ही गोष्टी लिंक करण्यासाठी 1 सप्टेंबरपर्यंतचा अवधी मिळाला आहे. यापूर्वी EPFO ने नोकरदारांना या कामासाठी 1 जूनपर्यंतचा अवधी देऊ केला होता.

PAN Aadhaar Linking: पॅनकार्डला आधार लिंक करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या शेवटची तारीख
पॅनकार्ड आधार लिंकिंग
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 8:58 AM

मुंबई: केंद्र सरकारने पॅनकार्डाला आधारला लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी याबद्दलची घोषणा केली. त्यानुसार, आता पॅनकार्ड (Pancard) आणि आधार लिंक (Aadhar Card) करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पॅन आधारशी जोडलं नाही तर पॅन कार्ड धारकांना आयकर कायद्यानुसार दंड भरावा लागेल. जर दंड टाळायचा असेल तर अंतिम मुदत संपण्यापूर्वी पॅनला आधारशी लिंक करणे गरजेचे आहे. (PAN Aadhaar Linking deadline extended to 30 Sepetmber 2021)

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधीसाठी (EPFO) वापरल्या जाणारा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आधार कार्ड (Aadhaar number) लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली होती. त्यानुसार आता नोकरदारांना या दोन्ही गोष्टी लिंक करण्यासाठी 1 सप्टेंबरपर्यंतचा अवधी मिळाला आहे. यापूर्वी EPFO ने नोकरदारांना या कामासाठी 1 जूनपर्यंतचा अवधी देऊ केला होता. त्यानंतर UAN नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते.

पॅनकार्ड रद्द झालं तर काय अडचणी येतील?

जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

संबंधित बातम्या:

WhatsApp Banking ने व्यवहार आणखी सोपे, चॅटिंगद्वारे बँकेची 10 कामं शक्य!

आधारकार्ड घरी विसरलात? आता स्मार्टफोनमध्येच ठेवा आधारकार्ड, कसे कराल डाऊनलोड

Post Office Scheme : पोस्टाची भन्नाट योजना, फक्त 50 हजार गुंतवा आणि 3300 रुपये मासिक पेन्शन मिळवा

(PAN Aadhaar Linking deadline extended to 30 Sepetmber 2021)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.