AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधार, पॅन, वाहन परवाना एकाच ठिकाणी होणार अपडेट, काय आहे नवीन प्रणाली

पोर्टल विशिष्ट पद्धतीने डिजाइन केले आहे. त्यामुळे एकाच इंटरफेसच्या माध्यमातून वेगवेगळे डॉक्यूमेंट्स एकत्र करता येणार आहे. युजरला पोर्टलवर जाऊन नावात बदल, पत्त्यात बदल किंवा मोबाइल क्रमांक बदल असा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर गरजेचे दस्तावेज अपलोड करावे लागणार आहे.

आधार, पॅन, वाहन परवाना एकाच ठिकाणी होणार अपडेट, काय आहे नवीन प्रणाली
एकाच पोर्टलवर अनेक कागदपत्रे
Follow us
| Updated on: Apr 27, 2025 | 2:38 PM

Aadhar Card Update: आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच ठिकाणी अपडेट करण्याची सुविधा लवकरच मिळणार आहे. केंद्र सरकार त्यासाठी एक डिजिटल प्रणाली लॉन्च करणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व ओळखपत्र मिळणार आहे. बदल करणे आणि नवीन ओळखपत्र घरपोच मिळवणे ही सर्व कामे या पोर्टलवर होणार आहे.

केंद्र सरकार एक पोर्टल बनवत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, पासपोर्ट ही सर्व महत्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी अपडेट करता येणार आहे. त्यात नाव बदलणे, मोबाइल क्रमांक अपडेट करणे किंवा पत्ता नवीन करणे या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी होणार आहे. विशेष म्हणजे एका ठिकाणी हा बदल केल्यावर इतर सर्व ठिकाणी तो बदल ऑटोमॅटीक होणार आहे.

रिपोर्टनुसार, पोर्टल विशिष्ट पद्धतीने डिजाइन केले आहे. त्यामुळे एकाच इंटरफेसच्या माध्यमातून वेगवेगळे डॉक्यूमेंट्स एकत्र करता येणार आहे. युजरला पोर्टलवर जाऊन नावात बदल, पत्त्यात बदल किंवा मोबाइल क्रमांक बदल असा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर गरजेचे दस्तावेज अपलोड करावे लागणार आहे. मग केवळ तीन दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचे डॉक्यूमेंट अपडेट होणार आहे.

तुम्हाला अपडेट केलेले ओळखपत्र हवे असेल तर पोर्टलवर अर्ज करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर सात दिवसांत अपडेट ओळखपत्र तुमच्या घरी येणार आहे. तसेच तुम्ही जवळच्या कार्यालयातून नवीन डॉक्यूमेंट कलेक्ट करु शकतात.

काही वर्षांपूर्वी सरकार कागदपत्रे मिळवणे म्हणजे मोठे द्राविडी प्राणायाम ठरत होते. एखाद्या कागदपत्रासाठी अनेक दिवस सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. परंतु आता डिजिटील तंत्रज्ञानामुळे सर्व सुविधा नागरिकांना घरबसल्या मिळत आहे.

भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर.
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.