AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयकर विभागाचे तीन मोठे निर्णय, करदात्यांवर काय परिणाम होणार?

Income Tax Department | पॅनला आधारशी जोडण्यासाठी सरकारने आणखी सहा महिने दिले आहेत. ही मुदत या वर्षी 30 सप्टेंबरला संपत होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड -19 साथीमुळे लोकांना भेडसावत असलेल्या समस्या लक्षात घेऊन, मुदत वाढवण्यात आली आहे.

आयकर विभागाचे तीन मोठे निर्णय, करदात्यांवर काय परिणाम होणार?
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 9:43 AM

नवी दिल्ली: आधारला पॅनशी जोडण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी, आयकर विभागाने शुक्रवारी तीन मोठे निर्णय घेतले आहेत. सरकारने पॅन कार्ड बायोमेट्रिक आयडी आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. यासोबतच, सरकारने थेट कर निराकरण योजना ‘विवाद से विश्वास’ अंतर्गत पेमेंटची तारीखही वाढवली आहे आणि बेनामी मालमत्ता व्यवहार रोखण्याबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे या सर्व गोष्टींसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

पॅनला आधारशी जोडण्यासाठी सरकारने आणखी सहा महिने दिले आहेत. ही मुदत या वर्षी 30 सप्टेंबरला संपत होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड -19 साथीमुळे लोकांना भेडसावत असलेल्या समस्या लक्षात घेऊन, मुदत वाढवण्यात आली आहे.

पॅनकार्ड आधारशी जोडण्यासाठी पुढील वर्षापर्यंत मुदतवाढ

पॅनला आधारशी जोडण्यासाठी आयकर विभागाला आधार क्रमांक कळवण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 ऐवजी 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आयकर खात्याने पॅन कार्डधारकांना त्यांचे पॅन आधार कार्डाशी वेळेत जोडण्यास सांगितले आहे, अन्यथा त्यांचे पॅन निष्क्रिय केले जाईल.

पॅनकार्ड रद्द झालं तर काय अडचणी येतील?

जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

आधारकार्ड UAN नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 डिसेंबरपर्यंत वाढवली

केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधीसाठी (EPFO) वापरल्या जाणारा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आधार कार्ड (Aadhaar number) लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यानुसार आता नोकरदारांना या दोन्ही गोष्टी लिंक करण्यासाठी 1 डिसेंबरपर्यंतचा अवधी मिळाला आहे. यापूर्वी EPFO ने नोकरदारांना या कामासाठी 1 सप्टेंबरपर्यंतचा अवधी देऊ केला होता. त्यानंतर UAN नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तुर्तास नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या:

WhatsApp Banking ने व्यवहार आणखी सोपे, चॅटिंगद्वारे बँकेची 10 कामं शक्य!

आधारकार्ड घरी विसरलात? आता स्मार्टफोनमध्येच ठेवा आधारकार्ड, कसे कराल डाऊनलोड

Post Office Scheme : पोस्टाची भन्नाट योजना, फक्त 50 हजार गुंतवा आणि 3300 रुपये मासिक पेन्शन मिळवा

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.