Paytm App PMJAY | पेटीएमवर आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे फीचर, युजर्सना मिळतील या सुविधा

Paytm App PMJAY | आता पेटीएम अॅपवर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अथवा पीएम आयुष्मान भारत हेल्थ इन्शुरन्सचा फायदा घेता येणार आहे.

Paytm App PMJAY | पेटीएमवर आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे फीचर, युजर्सना मिळतील या सुविधा
पेटीएम झाले आरोग्यदूतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 6:22 PM

Paytm App PMJAY | पेटीएम विविध सरकारी योजना अॅड ऑन करण्यात आघाडीवर आहे. विविध योजनांचे भांडार पेटीएम अॅपवर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे. Paytm अॅपवर पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMJAY) अथवा पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विमा सेवेचा लाभ ही घेता येणार आहे. One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही कंपनी पेटीएमची मालक आहे. पेटीएमचे वापरकर्त्यांना (Users) या योजनेसाठी त्यांची पात्रता अॅपवर तपासता येईल. तसेच या योजनेचा लाभ ही त्यांना घेता येणार आहे. युजर्संना या योजनेतंर्गत त्यांच्या जवळच्या रुग्णालयाची माहिती प्राप्त करता येईल. पेटीएमच्या या पुढाकारामुळे आरोग्य क्षेत्रात डिजीटल परिवर्तनाची नांदी होत आहे. पेटीएमने या उपक्रमात सहभाग नोंदवल्याने त्याचा केंद्र सरकारला आणि सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होणार आहे.

काय आहे योजना

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) ही केंद्र सरकारची योजना आहे. पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या(PMJAY) अंतर्गत 10 कोटी कुटुंबांना दरवर्षी आरोग्य विमा दिला जाणार आहे. या योजनेत प्रत्येक कुटुंबाला वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळते. या योजनेची सुरुवात 23 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी झाराखंड पासून करतील.योजनेंतर्गत, रुग्णाला उपचारासाठी भरती करणे, त्यानंतरची काळजी, अन्नसुविधा, औषधी, निदान आणि प्रयोगशाळेसंबंधीच्या सुविधा इत्यादींशी संबंधित खर्च देण्यात येतो. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेत कोविड-19 च्या उपचाराशी संबंधित खर्चाचाही देण्यात येतो.

येथे तपासा नाव

या योजनेचा लाभ सामाजिक-आर्थिक जनगणनेच्या आधारावर मिळतो. सामाजिक-आर्थिक जनगणनेच्या डेटाबेसवर या योजनेचा लाभ घेऊ शकतात, अशा लोकांचा मोबाईल नंबर आणि रेशन कार्डचा नंबर घेतला गेला. त्याबाबत mera.pmjay.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अथवा हेल्पलाइन(14555) वर कॉल करून जाणून घेऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

काय होईल फायदा

पेटीएम अॅपच्या या उपक्रमामुळे, युजर्सला आता PMJAY लाभ देणार्‍या खाजगी आणि सरकारी रुग्णालयांबद्दल तात्काळ माहिती मिळेल.

PMJAY योजनेंतर्गत समाविष्ट असलेले जवळचे रुग्णालय त्याला लगेचच शोधता येईल. तसेच आरोग्य विम्याचा संपूर्ण तपशील आणि सुविधांची माहिती मिळेल.

PMJAY योजनेतंर्गत आरोग्य विमा संरक्षणाची माहिती रुग्णालयाच्या समुपदेशकांना आणि कर्मचाऱ्यांना अॅपच्या माध्यमातून दाखविता येईल.

पेटीएम अॅपवर PMJAY ची पात्रता अशी तपासा

पेटीएम अॅपवर लॉग इन करा.

खाली स्क्रोल करा आणि पेटीएम हेल्थ अंतर्गत PMJAY पर्यायावर क्लिक करा

पात्रता या पर्यायावर क्लिक करा

तुमच्या राज्याचे नाव टाका

तुमचे नाव, रेशन कार्ड, HHD नंबर (हाऊस होल्ड आयडी नंबर) मोबाईल क्रमांक आणि RSBY URN टाका.

युजरचा तपशील कुटुंबातील सदस्यांसह स्क्रीनवर दिसेल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.