Petrol Diesel Prices Today : निवडणूका संपल्या, सरकारं बनली, पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली, मुंबईत पेट्रोल सव्वाशे रुपये लीटर होणार ?
दिल्लीत मंगळवारी एक लिटर पेट्रोलच्या किंमती 96.21 रुपये आणि डिझेलच्या किंमती 87.47 रुपये असेल. किंमतीत आता नियमीत वृद्धी होऊ शकते असे एका डीलरने सांगितले.
अखेर पेट्रोल-डिझेल दरवाढीने (Petrol-Diesel Price) एकदाचा मुहूर्त गाठलाच. आज इंधन दरवाढ लागू झाली. मंगळवारपासून इंधनाच्या दरात 80 पैशांची वाढ झाली. 137 दिवसानंतर ही दरवाढ लागू होत आहे. नवीन किंमती आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाल्या. सोमवारी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. वृत्तसंस्था रॉयटर्सने (Reuters) दिलेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री दरवाढीसंदर्भात डीलरने माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 80 पैसे प्रती लिटरची दरवाढ झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शेवटची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर दिवाळी व पुढे निवडणुका (Election) यामुळे सरकारने दरवाढ थोपवल्याची चर्चा रंगली होती. तसेच निकालानंतर लगेचच मोठी दरवाढ होईल अशी भीती व्यक्त होत होती. पण सरकार जोर का झटका हळू देण्याच्या विचारात असेल, अशी आता चर्चा रंगत आहे. इंधनाच्या किरकोळ किंमतींविषयी तेल कंपन्यांनी त्यांना मंगळवारी माहिती दिली. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांनी इंधन किरकोळ भाव एकदाच वाढविले आहे. या कंपन्या दरवाढीचा निर्णय एकदाच घेतात.
दरवाढीनंतर मुंबईत एक लिटर पेट्रोल 110.82 रुपये रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक पातळीवर तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर रुपयांचे ही अवमुल्यन झाले आहे. रुपया आंतरराष्ट्रीय बाजारात कमजोर आहे. सध्या झालेली दरवाढ 1 टक्क्यांहून कमी आहे. मुंबईत मंगळवारी एक लिटर पेट्रोलच्या किंमती 110.82 रुपये तर एक लिटर डिझेलची किंमत 95 रुपये झाली. किंमतीत आता नियमीत वृद्धी होऊ शकते असे एका डीलरने सांगितले. सरकारच्या अखत्यारीतील तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबर 2021 पासून किंमतीत कुठलीही वाढ केलेली नव्हती. उलट सरकारने त्यावरील कर कमी केला होता.
तुमच्या शहरात काय आहे इंधन दर
शहर पेट्रोल (प्रति लिटर भाव) डिझेल (प्रति लिटर भाव)
मुंबई 110.82 95 नवी मुंबई 111 95.18 पुणे 110.67 93.45 नाशिक 111.24 94 जळगाव 111.80 94.57 कोल्हापूर 111.37 94.15 औरंगाबाद 112.25 96.71 अकोला 111.12 93.91 नागपूर 111.03 93.83
किंमत दररोज संध्याकाळी 6 वाजता बदलतात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. या नव्या किंमती सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर वस्तू जोडल्यानंतर किंमत जवळजवळ दुप्पट होते.
तुमच्या शहरातील इंधन दर जाणून घ्यायचे आहेत ? आपण एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल-डिझेलचे दररोजचे दर जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP टाईप करुन 9224992249 या मोबाईल क्रमांक आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP टाईप करुन 9223112222 क्रमांकावर पाठवावा. तर, एचपीसीएल (HPCL) ग्राहक एचपीप्राइस (HPPrice) टाईप करुन तो 9222201122 या मोबाईल क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतो.