देशभरात गेल्या आठवडाभरापासून भाववाढीच्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी जनतेला किंचित दिलासा मिळाला . देशातील तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात कोणत्याही प्रकारे वाढ केली नाही, त्यामुळे आज सर्व प्रमुख शहरांना 6 एप्रिल रोजीच्या दराने पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. आज गेल्या १७ दिवसांत तिसऱ्यांदा इंधनाच्या (fuel price) किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. तब्बल दीड महिन्यानंतर 22 मार्चपासून देशभरात पेट्रोल डिझेल दर वाढू लागले आणि याच काळात राजधानी दिल्लीत तेलाचे दर प्रति लिटर 10 रुपयांनी वाढले आहेत. तर राज्यातील अनेक शहरांमध्ये सात ते दहा रुपयांची लिटर मागे वाढ झाली आहे. मीडिया अहवाला नुसार, इंधन दरवाढीपासून लोकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) मोठी योजना आखत आहे.
ईटी नाऊ स्वदेशला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही. या अहवालानुसार महागड्या तेलाच्या किमतीपासून जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने देशातील प्रमुख तेल विपणन कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली नाही आणि ती अशीच वाढत राहिली तर सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर आकारण्यात येणाऱ्या उत्पादन शुल्कात कपात करण्यात येईल, जेणेकरून जनतेची महागड्या इंधनांपासून सूटका होईल. याशिवाय केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात करण्यास सांगितले आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात करण्याची घोषणा केली होती. ज्यानंतर राज्यांनी आपापल्या स्तरावर तेल खरेदीवर करसवलत आकारण्याची घोषणाही केली होती. 4 नोव्हेंबर 2021 रोजी पासून जवळपास साडेचार महिने देशभरात इंधन दर पूर्णपणे स्थिर राहिले. याच काळात देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही झाल्या आणि त्याचे निकालही लागले. 22 मार्चपासून म्हणजे निवडणुका पार पडल्यानंतर 11 दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दरात वाढ झाली आणि या 16 दिवसांत इंधनाचे दर लिटरमागे 10 रुपयांनी महागले.
निवडणुकीच्या वेळी पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या किमतींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव त्या काळात सतत वेगाने वाढत असल्याने तेल कंपन्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले. मार्चच्या सुरुवातीला कच्च्या तेलाचे दर 130 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 120 रुपयांच्या पुढे गेले आहेत.काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तेल कंपन्यांनी सातत्याने तेलाचे दर वाढविण्यास सुरुवात केली.त्यामुळे दिल्लीत एक लिटर पेट्रोल 105 रुपये, चेन्नईत 110 रुपये, कोलकात्यात 115 रुपये आणि मुंबईत 120 रुपयांच्या पुढे गेले आहे.
हेही वाचा:
CNG चे ही पेट्रोल-डिझेलच्या पावलावर पाऊल, मुंबईत भाव 67 रुपयांवर
तरुण उद्योजकांना सुवर्णसंधी… कामगार मंत्रालयाकडून 112 जागांसाठी भरती