PF Withdrawal: पीएफ कधी काढता येतो?; जाणून घ्या पीएफबाबतच्या महत्त्वाच्या अटी
तुम्ही जर सरकारी किंवा खासगी कर्मचारी असाल तर दर महिन्याला तुमच्या वेतनामधून विशिष्ट रक्कम कपात होते. ती रक्कम तुमच्या पीएफ खात्यामध्ये जमा करण्यात येते. ही पीएफची रक्कम तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळात काढता येते.
नवी दिल्ली: तुम्ही जर सरकारी किंवा खासगी कर्मचारी असाल तर दर महिन्याला तुमच्या वेतनामधून विशिष्ट रक्कम कपात होते. ती रक्कम तुमच्या पीएफ खात्यामध्ये जमा करण्यात येते. ही रक्कम तुमच्या हक्काची असते. अडचणीच्या काळात तुम्ही तुमची पीएफची रक्कम काढू शकता. मात्र ही रक्कम काढताना अनेक नियम असतात. तुम्हाला जर तुमच्या पीएफ खात्यामधील सर्व रक्कम काढायची असेल तर त्यासाठी मुख्य अट म्हणजे तुम्ही दोन महिने बेरोजगार असणे आवश्यक आहे. पीएफ काढताना अनेक अटींची पूर्तता करावी लागते. अशाच काही अटींबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
लग्नासाठी पीएफ खात्यातून किती रक्कम काढता येते?
तुम्हाला जर तुमच्या किंवा तुमच्यावर अवलंबून असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या लग्नासाठी पैसे काढायचे असतील, तर तुम्ही पीएफ खात्यातून काही रक्कम काढू शकता. तुमच्या वतीने तुम्ही पीएफ खात्यामध्ये जेवढे पैसे जमा केले आहेत, त्याच्या 50 टक्के रक्कम ही तुम्हाला लग्नासाठी मिळू शकते. मात्र त्यासाठी तुम्ही कमीत कमी सात वर्ष तुमचा पीएफ कट होने आवश्यक आहे. मिळणाऱ्या पैशांमधून तुम्ही लग्नाचा खर्च करू शकता.
मुलाच्या शिक्षणासाठी पीएफची किती रक्कम मिळते?
तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असल्यास तुम्ही पीएफ काढू शकता. मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला तुम्ही पीएफ म्हणून जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत रक्कम मिळू शकते. मात्र यासाठी देखील तुम्ही सात वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरीमध्ये असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी किंवा मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पीएफ खात्यामधून पैसे काढ शकता.
घर खरेदी करण्यासाठी
तुम्हाला सर्वाधिक पैशांची गरज कधी असते, ती म्हणजे घर खरेदी करताना. घर खरेदी करताना देखील तुम्ही तुमच्या पीए खात्यामधून पैसे काढू शकता. घर खरेदी करण्यासाठी तुम्हाल तुम्ही जमा केलेल्या रकमेमधील 50 टक्क्यांपर्यंत रक्कम मिळू शकते. मात्र त्यासाठी तुम्ही सलग 5 वर्ष नोकरी करणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या
नव्या वर्षात महागाईचा भडका उडणार, ‘या’ वस्तूंच्या दरामध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता
डेबिट कार्ड सुरक्षीत कसे ठेवाल?; ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय
‘मेक इन इंडिया’ला पॅकेजचा बूस्टर डोस; सेमीकंडक्टरच्या निर्मितीला गती,भारताचा चीनला शह