UPI Payment : एकाच दिवशी 10 कोटींचा व्यवहार, तर महिनाभरात 2.5 अरबोंचा टप्पा पार, युपीआय पेमेंट अॅप कंपन्यांमध्ये स्पर्धा भडकणार
एकाच दिवशी 10 कोटींचा तर महिनाभरात तब्बल 2.5 अरब रुपयांच्या व्यवहाराचा टप्पा पार केल्याचा दावा फोन पे या युपीआय पेमेंट अॅपने केला आहे.फोन पेचे एकूण 1,650 लाख मासिक कार्यरत वापरकर्ते आहेत. कंपनीच्या या दाव्यामुळे आता युपीआय पेमेंटची सेवा देणा-या कंपन्यांमध्ये स्पर्धा भडकण्याची शक्यता आहे.
जगप्रसिद्ध वॉलमार्ट ची डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे (Phone pe) ने डिजिटल व्यवहारात नवा इतिहास रचला आहे.एका दिवसात या पेमेंट कंपनीने तब्बल 10 कोटींच्या व्यवहाराचा टप्पा ओलांडला आहे. डिजिटल पेमेंटच्या वाढत्या चलनामुळे फोन पे व्यतिरिक्त अन्य युपीआय पेमेंट (UPI Payment Company) कंपन्यांनी त्यांचा झपाट्याने विस्तार केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सुरक्षित व्यवहारासाठी या कंपन्याना प्रयत्नरत आहे. फक्त व्यवहारांवर अवलंबून न राहता, इतर अत्यावश्यक सेवा या एकाच अॅपच्या माध्यमातून पुरविण्याची सोय ही करण्यात आली आहे. बाजारात फोन पे व्यतिरिक्त पेटीएम(Paytm), गुगल पे (Google Pay) इत्यादी कंपन्या पण डिजिटल व्यवहाराची सोय उपलब्ध करुन देत आहेत. या यादीत आता व्हाट्सअपचे (Whatsup) पण नाव जोडल्या गेले आहे. त्यामुळे बोलता-बोलता, मॅसेज करता करता तुम्ही सहज पैसे ही पाठवू शकता.
डिजिटल वॉर भडकणार
\बंगळुरु मधील कंपनी फोन पे चे प्रतिस्पर्धी पेटीेएम, गुगल पे आणि अॅमेझॉन पे यासह व्हाट्सअप या कंपन्या आहेत. युपीआय आधारित पेमेंट कंपन्यांमध्ये अगोदरच रस्सीखेच सुरु आहे. फोन पे कडे 1650 लाख मासिक कार्यरत वापरकर्ते आहेत. इतर युपीआय पेमेंट कंपन्यांकडे ही साधारणतः कमी जास्त प्रमाणात ग्राहक आहेत. कोविड काळात सुरक्षित आणि त्वरीत सेवेमुळे डिजिटल पेमेंटला लोकांनी प्रचंड पसंती दिली आणि या व्यवहारात प्रचंड वाढ झाली. यामध्ये राष्ट्रीय देयके महामंडळाने (National Payments Corporation of India (NPCI)) सुरु केलेल्या युपीआय या सेवेची सर्वात मोठी भूमिका आहे. मोबाईल वॉटेल अॅपच्या माध्यमातून करण्यात येणारे हे सर्व व्यवहार सुरक्षित आणि गतिशिल असल्याने ग्राहक कुठेही हा व्यवहार सहज आणि सोप्या पद्धतीने करु लागला. त्याचा परिणाम डिजिटल पेमेंट सेवा अनेक पट्टीत वाढली.
फोन पेचा रेकॉर्ड
एकाच दिवशी 10 कोटींचा तर महिनाभरात तब्बल 2.5 अरब रुपयांच्या व्यवहाराचा टप्पा पार केल्याचा दावा फोन पे या युपीआय पेमेंट अॅपने केला आहे.फोन पेचे एकूण 1,650 लाख मासिक कार्यरत वापरकर्ते आहेत. कंपनीच्या या दाव्यामुळे आता युपीआय पेमेंटची सेवा देणा-या कंपन्यांमध्ये स्पर्धा भडकण्याची शक्यता आहे. भारतातील अग्रणी फिनटेक प्लॅटफॉर्मवर कंपनीचा टीपीवी रन रेट 780 दशलक्ष डॉलर इतका आहे. या कंपनीचे ग्राहक छोट्या शहरातील आहेत. विशेष म्हणजे 19,000 हून अधिक व्यवहार हे पिन कोडच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. मार्च 2022 मध्ये 540 कोटींचे युपीआय व्यवहार पूर्ण झाले आहेत. व्हाट्सअप डिजिटल व्यवहारातही कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. 15.78 टक्के वाढीची नोंद करत व्हॉट्सअपने मार्च महिन्यात 239.78 कोटींचे व्यवहार पूर्ण केले आहेत.
इतर बातम्या
Ujjani Dam : हातातली दोरी सुटल्याने 15 वर्षीय मुलगा कॅनॉलमध्ये बुडाला, परिसरात हळहळ
IPL 2022 Points Table: सलग पाच पराभवानंतर मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकतो का? समजून घ्या