Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाइन शिक्षणासाठी सरकार देत आहे 3 महिन्याचे फ्री मध्ये रिचार्ज, जाणून घेऊया व्हायरल मॅसेज मागील ट्रूथ फॅक्ट!

हल्ली प्रत्येकाच्या मोबाईलवर एका वेबसाईटची लिंक आवर्जून पाहायला मिळत आहे.या लिंकवर क्लिक केल्यावर वापरकर्त्याला रिचार्ज मिळेल. असा मॅसेज दिसत आहे. मॅसेज मध्ये म्हटले आहे की, ही ऑफर 24 जून 2022 पर्यंत मर्यादित कालावधीसाठी आहे. लवकर करा..

ऑनलाइन शिक्षणासाठी सरकार देत आहे 3 महिन्याचे फ्री मध्ये रिचार्ज, जाणून घेऊया व्हायरल मॅसेज मागील ट्रूथ फॅक्ट!
व्हायरल मेजेजचा फॅक्ट चेकImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 9:31 PM

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक मॅसेज वेगाने व्हायरल होत आहे. या मॅसेजमध्ये दावा केला गेला आहे की, सरकार ऑनलाईन शिक्षणासाठी सर्व वापरकर्त्याना 3 महिन्याचा फ्री मध्ये रिचार्ज देत आहे. या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे की, जर तुमच्याकडे जिओ, एअरटेल किंवा वोडाफोन आयडियाचे सिम असेल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. आपणास सांगू इच्छितो की, भारत सरकारने अशा कोणत्याही प्रकारच्या योजनेचा किंवा वापरकर्त्याना रिचार्ज (recharge massage) करण्याबाबत कुठलीही घोषणा केली नाही. हा एक धोका आहे. जर नागरिकांनी व्हायरल झालेल्या मॅसेज वर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला तर त्यांच्यासोबत मोठा धोका होऊ शकतो. या सायबर धोक्यापासून वाचवायचे असेल तर आपल्याला सावध राहणे गरजेचे आहे. वरील माहिती पीआयपी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने दिली आहे.

आपणास सांगू इच्छितो की कोरोना महामारी च्या काळात सुद्धा अनेक असे व्हायरल मॅसेज अनेकांच्या मोबाईलवर पाहायला मिळाले होते. काही मॅसेजमध्ये सरकारी नोकरी मिळवून देण्याचा वादा करण्यात आला होता तर काही मॅसेज मध्ये जर आपण मत दिल्यास आपल्या खात्यामध्ये 350 रुपये दिले जातील, अशा वेगवेगळ्या ऑफर्स असलेला एक मेसेज गेल्या अनेक दिवसांत व्हायरल झाले होते.

काय आहे नेमका व्हायरल मेसेज ?

पीआयबी फॅक्ट चेक ने सांगितले की ,भारत सरकार द्वारे अशा कोणत्याही प्रकारची घोषणा केली गेलेली नाही. हा दावा पूर्णपणे खोटा आहे.या मॅसेजेसमध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे. या मेसेज मध्ये एका वेबसाइटची लिंक देण्यात आलेली आहे. या वेबसाईटच्या लिंक वर क्लिक केल्यावर आपल्याला 3 महिन्याचा रिचार्ज फ्री मध्ये मिळेल असे देखील म्हटले आहे, त्याचबरोबर ही ऑफर फक्त 24 जून 2022 पर्यंतच मर्यादित आहे. वेळ न दवडता लवकरच या ऑफरचा लाभ घ्यावा असे देखील सांगण्यात आलेले आहे.

सरकारी नोकरी मिळवून देण्याचा दावा

काही दिवसांपूर्वी असाच एक मॅसेज व्हायरल झाला होता.त्या मेसेजमध्ये भारतीय मिशन रोजगार योजना नावाची एका वेबसाईटने बेरोजगार यांना 1280 रुपये भरायचे अन् त्या बदल्यात सरकारी नोकरी मिळवून देण्याचा दावा केला होता. पिआयबी फॅक्ट चेक ने म्हटले की, ही वेबसाईट खोटी आहे भारत सरकार द्वारे अशा कोणत्याही प्रकारच्या योजनांची घोषणा देखील केली गेली नाही किंवा भारत सरकारने कोणत्याही प्रकारची योजना चालू केली नाहीये. अशा प्रकारच्या मॅसेज पासून प्रत्येक नागरिकाने सावध राहायला हवे अन्यथा भविष्यात खूप मोठ्या संकटांना तुम्हाला सामोरे जावे लागेल.

असाच एक मॅसेज सुद्धा सगळीकडे फिरत होता की त्या मॅसेजमध्ये सांगण्यात आले की,नवीन शिक्षण प्रणालीनुसार लवकरच दहावीच्या बोर्डाची परीक्षा संपुष्टात ये. PIB फॅक्ट चेक ने याबद्दलची सत्यता पडताळली तेव्हा हा दावा देखील फोल ठरलेला आहे. नवीन शिक्षा प्रणाली नुसार दहावी बोर्ड परीक्षा बंद करण्याचा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही आणि म्हणूनच अशा कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या मेसेजवर अजिबातच विश्वास ठेवू नका.

आपणास सांगू इच्छितो की,PIB फॅक्ट चेक सरकारी योजना आणि चुकीच्या पद्धतीने माहिती देणे यांचे खंडन करतो. जर तुम्हाला सरकार संबंधित एखादा मॅसेज खोटा किंवा फसणुकी होईल असा संशय आल्यास तर त्वरित पीआयबी फॅक्ट चेकला याबद्दल त्वरित माहिती द्या यासाठी तुम्हाला 918799711259 या मोबाईल नंबर वर socialmedia@pib.gov.in इमेल आयडीवर संदेश मेसेज पाठवू शकता.

EPFO | टीडीएस जमा न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढता येते? काय आहे नवीन नियम?

कच्च्या तेलाची रॉकेट भरारी, 14 वर्षांत पहिल्यांदा किंमती 130 डॉलरवर तर सोन्यालाही दरवाढीची झळाळी

सर्वाधिक व्याजासहित कर सवलतीचा ही फायदा, या योजनेत करा गुंतवणूक

छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.