PM Kisan : 31 मार्चच्या आत करा आधार केवायसी, अन्यथा रहावे लागेल अनुदानापासून वंचित
पीएम किसान (PM Kisan) योजनेंतर्गंत शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांना दोन हजारांचे अनुदान देण्यात येते, मात्र आता जर तुम्ही आधार केवायसी केले असेल तरच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. जर तुमचे केवायसी अपडेट नसेल तर तुम्हाला या अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे.
नवी दिल्ली : पीएम किसान (PM Kisan) योजनेंतर्गंत शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांना दोन हजारांचे अनुदान देण्यात येते, मात्र आता जर तुम्ही आधार केवायसी केले असेल तरच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. जर तुमचे केवायसी अपडेट नसेल तर तुम्हाला या अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे 31 मार्चच्या आत केवायसी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तुम्ही तुमच्या परिसरात असलेल्या सीएससी (CSC) केंद्रात जाऊन केवायसी करू शकता. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार केवायसी केले आहे, त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा होईल. मात्र जे शेतकरी कोवायसी करणार नाहीत त्यांना लाभापासून वंचित राहावे लागू शकते. केवायसी करण्यासाठी सर्व प्रथम पीएम किसानची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या. ही बेवसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला (EKYC) नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा, तिथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाका, त्यानंतर तुमच्या आधार कार्डला व्हेरिफाय करण्यासाठी आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर तिथे टाका. त्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी येईल तो सबमिट केल्यानंतर तुमची केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल.
केवायसी आवश्यक
‘पीएम’ किसान योजनेंतर्गत देण्यात येणारा अकरावा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला आधार केवायसी करणे गरजेचे आहे. त्यासाटी 31 मार्च, 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 31 मार्च, 2022 च्या आत तुम्हाला तुमचे केवायसी पूर्ण करावे लागणार आहे. अन्यथा तुमच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी आधार केवायसी केले आहे, त्यांच्या खात्यात थेट अकरावा हफ्ता जमा होईल. जे शेतकरी 31 मार्च नंतरही आधार केवायसी करणार नाहीत ते या लाभापासून वंचित राहू शकतात.
काय आहे पीएम किसान योजना?
पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँका खात्यावर दर तीन महिन्याला दोन हजार या प्रमाणे वर्षभरात सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेंतर्गत एकूण दहा हफ्ते देण्यात आले असून, लवकच अकरावा हफ्ता जमा करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत आधार केवायसी करणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास किती टॅक्स लागतो; जाणून घ्या परताव्यावरील टॅक्सचे संपूर्ण गणित
Ramdev Baba यांची कंपनी देतेय कमाईची संधी, संधीचे करा सोने; 28 मार्चपर्यंत गुंतवणुकीची संधी