AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारभावापेक्षा कमी किंमतीतलं घरं तुमची वाट पाहतंय… ‘पीएनबी’कडून मालमत्तांचा ‘मेगा ई-लिलाव’

‘पीएनबी’ बँकेने या संदर्भात नुकतेच एक ट्विट करून याबाबची माहिती दिली आहे. या लिलावातून बाजारभावापेक्षा कमी किंमतीत घरे, गाळे आदींसाठी बोली लावता येणार आहे. अनेक प्रकारच्या मालमत्ता थेट बँकेतून योग्य किंमतीत खरेदीची संधी मिळणार आहे.

बाजारभावापेक्षा कमी किंमतीतलं घरं तुमची वाट पाहतंय... ‘पीएनबी’कडून मालमत्तांचा ‘मेगा ई-लिलाव’
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: TV9
| Updated on: Feb 13, 2022 | 6:33 PM
Share

स्वस्तात घर घेण्याच्या विचारात असाल तर थांबा, कारण पंजाब नॅशनल बँकेने नुकतीच एका खास ऑफरची घोषणा केली आहे. ज्या माध्यमातून तुम्हाला बाजार भावाच्या कमी किंमतीमध्ये घरे, दुकाने तसेच इतर मालमत्ता खरेदी करून आपल्या पैशांची बचत करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) जाहीर केलेल्या ई-लिलावाअंतर्गत (e-auction) घर, दुकान आणि जमीन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी हा मेगा ई-लिलाव होणार आहे. येत्या आठवडाभरात 2490 निवासी, 607 व्यावसायिक आणि 255 औद्योगिक मालमत्तांचा (property) लिलाव या माध्यमातून करण्यात येणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

सर्वप्रथम यादी तपासा

या लिलावात बाजारभावापेक्षा कमी बोली लावून मालमत्ता खरेदी करता येणार आहे. ई-लिलावाअंतर्गत, घरापासून ते दुकानांपर्यंत अनेक प्रकारच्या मालमत्ता थेट बँकेतून योग्य किंमतीत खरेदी करता येईल. लिलावात सहभागी होण्याआधी, मालमत्तांची यादी तपासणे फार महत्त्वाचे आहे कारण या मालमत्ता वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत.

पारदर्शक पद्धतीने ई-लिलाव

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, की पीएनबी 15 फेब्रुवारी 2022 रोजी देशभरातील निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचा ऑनलाइन मेगा ई-लिलाव आयोजित करत आहे. ‘PNB SARFAESI’ कायद्यांतर्गत पारदर्शक पद्धतीने ई-लिलाव आयोजित करत आहे. भारतीय बँकस्‌ असोसिएशन (IBA)चा इंडियन बँक्स् ऑक्शन प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन (IBAPI) पोर्टल हा एक उपक्रम आहे, जो अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या (DFS) धोरणांतर्गत बँकेद्वारे लिलाव करण्यात येणाऱ्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे एक व्यासपीठ आहे.’

‘या’ मालमत्तांचा होणार लिलाव

बँक त्या मालमत्तांचा लिलाव करतात, ज्या लोकांनी बँकेकडून दीर्घकाळ कर्ज घेतले आहे, परंतु काही कारणास्तव एकतर ते लोक कर्जाची परतफेड करू शकत नाहीत किंवा कर्जाची परतफेड करण्यास जाणूनबुजून चालढकल करतात. अशा लोकांच्या जमिनी किंवा भूखंड बँकेने ताब्यात घेतले आहेत. काही काळानंतर, बँक अशा मालमत्तेचा लिलाव करते आणि लिलाव केलेल्या मालमत्तेतून त्याचे पैसे वसूल करते.

‘अशी’ करा नोंदणी

लिलावात सहभागी होण्यासाठी, प्रथम eBKray पोर्टलला भेट देऊन नोंदणी करावी लागेल. पुढे, ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’वर क्लिक करा आणि फोन नंबर, ई-मेल पत्ता आणि आयडी टाका. यानंतर, तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करून ‘केवायसी’ करून घ्या. त्यानंतर, बोलीदाराने ‘ईएमडी’ची रक्कम ‘ग्लोबल ईएमडी वॉलेट’मध्ये ट्रान्सफर करावी. त्यानंतर तुमचे चलन ‘ई-ऑक्शन प्लॅटफॉर्म’वर अपलोड करावे लागेल. यानंतर तुम्ही ‘ई-ऑक्शन प्लॅटफॉर्म’वर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पध्दतीने लिलावात सहभाग घेऊन तुमची बोली लावू शकता.

आणखी वाचा : 

सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करायचीये?; मग ‘या’ दहा गोष्टींचा आवश्य विचार करा, नुकसान टाळा

बँकेत गॅरंटर होऊन तुम्ही फसला आहात का? मग गॅरंटरमधून ‘अशी’ करून घ्या आपली सुटका

पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल सव्वाशेपार? पहा अर्थमंत्री कराड काय म्हणतात

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.