Punjab National Bank | पीएनबीचा ग्राहकांना झटका, दोन महिन्यांत दुसऱ्यांदा बँक बचतीवरील व्याजदरात कपात

10 लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यांसाठीचे व्याजदर सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने वार्षिक 2.70 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत.

Punjab National Bank | पीएनबीचा ग्राहकांना झटका, दोन महिन्यांत दुसऱ्यांदा बँक बचतीवरील व्याजदरात कपात
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 4:23 PM

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. पीएनबीने आपल्या बचत खात्यांवरील व्याजदरात (Interest rate) कपात केली आहे. 10 लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यांसाठीचे व्याजदर सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने वार्षिक 2.70 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. त्याच ठिकाणी 10 लाख ते 500 कोटी रुपये शिल्लक रक्कम असलेल्या खात्यांचा व्याजदर वार्षिक 2,75 टक्के करण्यात आला आहे. नवे दर 4 एप्रिल 2022 पासून लागू झाले आहेत. पीएनबीने आपल्या संकेतस्थळावर याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार , हे भारतीय आणि अनिवासी भारतीय (NRI) अशा दोन्ही खातेधारकांना लागू होईल. पीएनबी’च्या या निर्णयामुळे लाखो ठेवीदारांवर परिणाम होणार असून, यात अशा अनेक  ठेवीदारांचा समावेश आहे, ज्यात त्यांच्या खात्यात  10 लाख रुपयांची शिल्लक आहे. भारतीय स्टेट बँकेनंतर पीएनबी ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक आहे. लाखो ग्राहकांचे पीएनबीमध्ये बचत खाते आहे.

दोन महिन्यांत दुसऱ्यांदा व्याजदर कपात

दोन महिन्यांत पीएनबीने ठेवीदारांच्या बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील या बॅंकेने आपल्या बचत खात्यांवर दरकपातीची घोषणा केली होती. 10 लाख रुपयांपर्यंत शिल्लक रक्कम असलेल्या खात्यांचा व्याजदर 2.75 टक्के होता. त्याचबरोबर 10 लाख ते 500 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बचत खात्यांसाठी वार्षिक 2.80 टक्के व्याजदर देण्यात येत होता. आरबीआयच्या द्वैमासिक पतधोरण समितीच्या बैठकीच्या काही दिवस आधी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने या दोन दरांमध्ये 0.5 टक्के कपात केली होती. फेब्रुवारी महिन्यात पीएनबीने असेही जाहीर केले होते की, खातेधारकाने त्याच्या खात्यात पुरेशी शिल्लक रक्कम नसल्याने ईएमआय किंवा अन्य कोणताही हप्ता न भरल्यास पूर्वी 100 रुपये असलेला 250 रुपये दंड आकारला जाईल.इतकेच नव्हे तर पंजाब नॅशनल बँकेने मोठ्या शहरात (Metro City) भागातील तिमाही सरासरी शिल्लकची (QAB) मर्यादा यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून पाच हजार रुपयांनी वाढवली आहे. पीएनबीने ग्रामीण, निमशहरी, शहरी आणि मेट्रो शहरांसह सर्वच भागात लॉकर चार्जेसमध्ये वाढ केली आहे, तर बँक लॉकरची मोफत भेटेची मर्यादाही कमी करण्यात आली आहे.

नवीन नियम लागू झाला.

पंजाब नॅशनल बँकेने 4 एप्रिल 2022 पासून 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेश पेमेंटसाठी अनिवार्य पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू केली आहे. त्यामुळे 18 कोटींहून अधिक ग्राहक धनादेश फसवणुकीपासून वाचतील. नव्या नियमानुसार बँकेला संबंधित धनादेश वटल्यानंतर संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. हे धनादेश जारी करणाऱ्याला धनादेश वटवताना फसवणूक टळेल. या नियमानंतर कन्फर्मेशन झालं नाही तर धनादेश न वटवता मागे घेता येईल.

Latur Market : हरभऱ्याची आवकही वाढली अन् दरही, शेतकऱ्यांचे लक्ष सोयाबीनवरच

Sanjay Raut : ‘कष्टातून मिळवलेली सगळी संपत्ती भाजपाला दान करायला तयार’

भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो, तर मग त्यांना बिस्किटं टाका; पालिका अधिकाऱ्यांचा अजब सल्ला

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.