PNB Home Auction | स्वस्तात घर खरेदीची संधी, पंजाब नॅशनल बँकेची ही खास ऑफर माहिती आहे का?

PNB Home Auction | घर असो वा दुकान, स्वस्तात खरेदी करायचे आहे? तर मग ही ऑफर तुमच्यासाठी. पंजाब नॅशनल बँक ही खास ऑफर घेऊन आली आहे. 25 ऑगस्ट रोजी ई लिलाव होणार आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी तुम्हाला https://ibapi.in या ई-सेल पोर्टलला भेट द्यावी लागेल.

PNB Home Auction | स्वस्तात घर खरेदीची संधी, पंजाब नॅशनल बँकेची ही खास ऑफर माहिती आहे का?
स्वस्तात घर मिळवण्याची संघी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 5:20 PM

PNB Home Auction | घर (Home)असो वा दुकान, स्वस्तात खरेदी करायचे आहे? तर मग ही ऑफर तुमच्यासाठी. पंजाब नॅशनल बँक (PNB) ही खास ऑफर घेऊन आली आहे. पीएनबी काही मालमत्तांचा लिलाव (PNB Home Auction) करणार आहे. या लिलावाच्या मालमत्ता स्वस्तात खरेदी करता येणार आहे. लिलावाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक लिलावाद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. बोली लावणाऱ्यांना निवासी घरांसोबतच व्यावसायिक मालमत्ताही लिलावात खरेदी करता येणार आहेत. 25 ऑगस्ट रोजी हा ई-लिलाव (E-Auction) होणार आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी, तुम्हाला https://ibapi.in या ई-विक्री पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे. या ठिकाणी ई-बोली लावून तुम्हाला मालमत्ता खरेदी करता येणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेने ट्विट करून लिलावाची माहिती दिली आहे. पीएनबीने ट्विटमध्ये या आकर्षक ऑफरची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, “परवडणारी घरे आणि व्यावसायिक मालमत्तांचा शोध संपणार आहे. लिलावासाठी https://ibapi.in या ई-सेल पोर्टलवर लॉग इन करा.” ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की PNB SARFAESI कायद्याअंतर्गत देशभरातील निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांसाठी ऑनलाइन मेगा ई-लिलाव सुरू करत आहे. PNB नुसार, ज्यांना स्वस्तात घर घ्यायचे आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. पीएनबीने ई-लिलावात कसं सहभागी होता येईल याची माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

PNB ई-लिलावात असे व्हा सहभागी

मेगा ई-लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी, इच्छुक व्यक्तीने ई-सेल पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. इच्छुक खरेदीदारांना MSTC-IBAPI पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल.

लॉगिन केल्यानंतर, ‘पे प्री-बिड ईएमडी’ या लिंकवर क्लिक करा. एनईएफटी पर्याय निवडून चलन तयार करा. यानंतर खरेदीदाराला बँकेच्या पेजवर जाऊन एनईएफटी पेमेंट करावे लागेल.

केवायसी दस्तऐवज आणि सर्व वैयक्तिक माहिती दिल्यानंतर, खरेदीदाराला त्याच्या आवडीची मालमत्ता निवडून त्यावर बोली लावता येईल. ही किंमत त्या मालमत्तेसाठी अथवा निवासी जागा, व्यावसायिक जागांच्या निर्धारीत किंमतींपेक्षा जास्त असणे अथवा समान पातळीवर असणे आवश्यक आहे. सर्व गोष्टींचा पडताळा केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणवर क्लिक करायचे आहे. सर्व प्रक्रियेनंतर तुम्हाला किंमतही बदलता येणार आहे.

कोण करु शकणार अर्ज

वैयक्तिक, एखादा ग्रुप चित्रपट कंपनी सहकारी संस्था/न्यास सरकारी विभाग/पीएसयू इतर कोणतीही कायदेशीर संस्था

केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे

पॅन कार्ड किंवा फॉर्म 16 पत्ता पुरावा जसे की मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड किंवा मनरेगा जॉब कार्ड

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.