एका वेळी गुंतवा 50000 आणि मिळवा मासिक 3000 पेन्शन, ‘अर्थ’भविष्य बनवा सुरक्षित
तुम्ही विशिष्ट प्रकारची रक्कम पोस्ट ऑफिस मंथली स्कीम (Post Office MIS) मध्ये जमा केल्यानंतर प्रत्येक महिन्यात व्याज स्वरुपात रक्कम काढू शकतात.
नवी दिल्लीः सुरक्षित गुंतवणुकीसोबत (SECURE INVESTMENT) सर्वोत्तम परताव्याची प्रत्येकाची अपेक्षा असते. सर्व प्रकारचे गुंतवणूक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही पोस्ट ऑफिस योजनांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जातं. पोस्ट ऑफिसच्या (POST OFFICE SCHEME) एका योजनेनुसार तुम्हाला गुंतवणुकीनंतर मासिक स्वरुपाची ठराविक रक्कम प्राप्त करणं सहज शक्य ठरणार आहे. तुम्ही विशिष्ट प्रकारची रक्कम पोस्ट ऑफिस मंथली स्कीम (Post Office MIS) मध्ये जमा केल्यानंतर प्रत्येक महिन्यात व्याज स्वरुपात रक्कम काढू शकतात. सध्या पोस्टाच्या एमआयएस योजनेवर वार्षिक 6.6 टक्के व्याज दिले जाते. एका खातेधारकाला पैसे जमा करण्यासाठी किमान 4.5 लाखाची मर्यादा आहे. संयुक्त खातेधारक किमान 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात.
कालावधी किती?
एमआयएस योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असतो. व्यक्तिगत स्वरुपात योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो किंवा किमान तीन व्यक्ती संयुक्त स्वरुपात खाते उघडू शकतात. वय वर्ष दहा पुढील कुणीही एमआयएस योजनेचा भाग बनू शकतो.
योजनेचा लाभ कसा घ्याल-
· कोणतीही व्यक्ती किमान 1000 आणि कमाल 100 च्या पटीतील रकमेवर एमआयएस खाते उघडू शकतो
· व्यक्तिगत खातेधारकांसाठी 4.5 लाख आणि संयुक्त खातेधारकांसाठी 9 लाख रुपयांची मर्यादा आहे.
· संयुक्त खात्यामध्ये सर्व खातेधारकांची रक्कम समप्रमाणात असेल
निवृत्तीवेतन किती मिळते?
कोणतीही व्यक्तीने एकावेळेस एमआयएस खात्यात 50000 रुपये जमा केल्यास प्रत्येक महिन्याला 275 रुपये व्याज स्वरुपात मिळतील. वार्षिक आधारावर 3300 रुपये मिळतील. एक लाख रुपये जमा केल्यास प्रत्येक महिन्याला 550 मिळतील वार्षिक आधारावर 6600 रुपये आणि पाच वर्षात 33000 रुपये मिळतील.
परताव्यासोबत सुरक्षा-
पोस्टाच्या योजना आकर्षक परताव्यासोबत सुरक्षित गुंतवणुकीचा भाग मानल्या जातात. त्यामुळे उपलब्ध गुंतवणूक पर्यायातून अनेकजणांचा कल पोस्टाच्या योजनांत असतो. पोस्टाच्या योजनांसाठी विशिष्ट प्रकारच्या कागदपत्रांची निकड भासत नाही. कोणत्याही पोस्टाच्या कार्यालयात खाते उघडण्याची सुविधा त्वरित उपलब्ध असते.
संबंधित बातम्या
Havey rain: सांगलीला अवकाळी पावसाचा तडाखा; पावसामुळे शेतमालाचे नुकसान