पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 4 बचत योजना, जोखीम न घेता नफा मिळवा
गुंतवणूक करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा 4 बचत योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून खूप चांगला नफा कमावू शकता. चला जाणून घेऊया.

पैसे गुंतवणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या मासिक उत्पन्नातील काही भाग चांगल्या योजनेत गुंतवला पाहिजे. बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूक करतात, तर अनेक जण बँक एफडीमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणुकीसाठी भारतीय टपाल कार्यालयाकडून अनेक प्रकारच्या योजनाही राबविल्या जात आहेत.
पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवलेले पैसे सुरक्षित आहेत. सोबत मिळणारा परतावाही खूप चांगला आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा 4 बचत योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून खूप चांगला नफा कमावू शकता. चला जाणून घेऊया.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात PPF ही पोस्ट ऑफिसची अत्यंत लोकप्रिय योजना आहे. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7.1 टक्के परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही दरवर्षी 500 रुपयांपासून 1,50,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
पोस्ट ऑफिस टीडी योजना
पोस्ट ऑफिस टीडी स्कीम ही देखील पोस्ट ऑफिसची अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेत तुम्ही 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला 6.9 टक्के ते 7.5 टक्के व्याजदराने परतावा मिळतो.
किसान विकास पत्र (KVP)
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे दुप्पट करू शकता. मात्र, त्यासाठी 115 महिने वाट पाहावी लागणार आहे. या योजनेत तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. व्याजदर 7.5 टक्के आहे.
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही तुमच्या 10 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते उघडून गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला 8.2 टक्के परतावा मिळतो, जो इतर योजनांच्या तुलनेत खूप जास्त आहे.
पोस्टात बचत खाते का उघडावे? फायदे काय?
पोस्ट ऑफिस बचत खाते केवळ 500 रुपयांमध्ये उघडता येते. बँकांमधील बचत खात्याची मिनिमम बॅलन्स 5000 ते 10000 रुपयांच्या दरम्यान असते. त्यामुळे हे खूप खर्चिक आहे. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटवर 4.0 टक्के व्याज मिळते. पोस्टात बचत खात्यासह चेकबुक, एटीएम कार्ड, ई-बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सुविधा अशा बँकिंग सेवाही मिळतात.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)