Post Office Saving Schemes: आयुष्याची संध्याकाळ सुखात घालवायचीये तर ‘या’ योजनेत करा गुंतवणूक! चांगल्या परताव्याची हमी

आयुष्यभर राब राब राबतोच, पण आयुष्याची संध्याकाळ सुखात घालवायची असेल तर ही योजना तुमच्यासाठीच. टपाल खात्यातने (Post Office) ज्येष्ठ नागरिकांसाठी अल्पबचत गुंतवणूक योजना आणली आहे. यामाध्यमातून चांगला परतावा मिळतोच, शिवाय तुमची रक्कम ही सुरक्षित राहते.

Post Office Saving Schemes: आयुष्याची संध्याकाळ सुखात घालवायचीये तर 'या' योजनेत करा गुंतवणूक! चांगल्या परताव्याची हमी
टपाल खात्यातने ज्येष्ठ नागरिकांसाठी अल्पबचत गुंतवणूक योजना आणली आहे.Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 11:12 AM

भारतीय टपाल खाते (Post Office) ग्रामीण जनतेला आकर्षित करण्यासाठी विविध गुंतवणूक योजना आणते. या योजना देशामध्ये लोकप्रिय आहेत. पोस्ट खात्याच्या अनेक गुंतवणूक योजना (Investment Scheme) तुम्हाला निश्चित उत्पन्नातून मालामाल करु शकता. दर महिन्याला सातत्याने केलेली गुंतवणूक काही वर्षांनी तुम्हाला लखपती करेल. या योजनेत जोखीम तर नाही, उलट निश्चित उत्पन्नाची हमी आहे. विशेष म्हणजे या योजनेला सरकारचे संरक्षण आहे. चांगल्या व्याजदरासह सुरक्षित उत्पन्नाची हमी म्हणून मध्यमवर्ग ही या योजनेकडे आकर्षित झाला आहे. जर तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर, टपाल खात्यातील अल्पबचत गुंतवणूक योजना (Small Investment Scheme) तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. या योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतोच, पण यातील गुंतवणूक ही पुर्णतः सुरक्षित राहते. टपाल खात्याची अशीच एक योजना आहे, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही अशीच योजना आयुष्याची संघ्याकाळ सुखद आणि तणावमुक्त करते. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा तर मिळतोच पण गुंतवलेली रक्कम ही सुरक्षित राहते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) सारख्या योजनांमध्ये 7.4 टक्के व्याजदर मिळत होते, ते पुढे ही कामय आहे.60 वर्षांवरील लोक गुंतवणूक करू शकतात. किमान एक हजार रुपये किंवा त्याच्या पटीत आणि जास्तीत जास्त वार्षिक दीड लाख रुपये खात्यात जमा होऊ शकतात. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना राबवण्यात आली आहे. हे व्याजदर 1 एप्रिल 2020 रोजीपासून लागू आहेत. या योजनेत व्याजाची रक्कम 31 मार्च वा 30 सप्टेंबर अथवा 31 डिसेंबर रोजी जमा करण्यात येते. व्याजाची रक्कम त्या दिवशी ग्राहकाच्या खात्यात जमा करण्यात येते.

गुंतवणूक रक्कम

ज्येष्ठ नागरिक अल्पबचत योजनेत खातेधारकाला एक हजार रुपयांच्या पटीत केवळ एकदाच रक्कम जमा करता येते. गुंतवणुकीची रक्कम 15 लाख रुपयांपेक्षा जास्त नसते.

हे सुद्धा वाचा

खाते कोण उघडू शकतं

पोस्ट खात्याच्या ज्येष्ठ नागरिक अल्पबबचत योजनेत सहभागी होण्यासाठी 60 वर्षांवरील कोणताही व्यक्ती खाते उघडू शकते. तसेच 55 वर्षांपेक्षा अधिक 60 वर्षांपेक्षा कमी वयाचा कर्मचारी या योजनेत सहभाग नोंदवू शकतो. कर्मचा-याला निवृत्ती लाभांच्या एक महिन्यापूर्वी या योजनेत रक्कम गुंतवावी लागते. तसेच 50 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाचा संरक्षण दलातील कर्मचारी या योजनेत गुंतवणूक करु शकतो. या कर्मचा-यांनीही निवृत्ती लाभ मिळण्यापूर्वी या योजनेत गुंतवणूक करणे क्रमप्राप्त आहे. या योजनेत वैयक्तिक अथवा पती-पत्नीच्या नावे खाते उघडता येते. योजनेनुसार, जमा करण्यात आलेली रक्कम केवळ पहिल्या खातेधारकाची मानण्यात येईल.

योजनेचा कालावधी

या योजनेत खाते उघडल्यानंतर पाच वर्षात खाते बंद करता येते. त्यासाठी खातेधारकाला संबंधित पोस्ट खात्यात यासंबंधीचा अर्ज दाखल करावा लागतो. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या मृत्यू दिनाकांपासून त्याच्या खात्यावर टपाल खात्याच्या अल्पबचत योजनेच्या व्याजदरानुसार व्याज प्राप्त होईल. तुमचा जीवनसाथी एकमेव वारसदार असेल तर खाते कालावधी पूर्ण होईपर्यंत सुरु ठेवता येते. परंतू, तुमच्या जीवनसाथीकडे या योजनेत दुसरे खाते सुरु नसावे ही अट लागू आहे.

कर सवलत

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक कर बचतीच्या टप्प्यात येते. प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत या बचतीवर नागरिकाला कर सवलत मिळते.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.