PPF अकाऊंटवरही मिळू शकते अत्यंत कमी व्याजदरात कर्ज, जाणून घ्या सर्वकाही
PPF Account | PPF योजनेअंतर्गत कर्ज खात्याच्या तिसऱ्या ते सहाव्या आर्थिक वर्षापर्यंत घेता येते. जर 2020-21 मध्ये खाते उघडले गेले तर 2022-23 पासून कर्ज घेता येईल. हे 36 महिन्यांच्या कालावधीसाठी असेल. म्हणजेच हे अल्प मुदतीचे कर्ज आहे आणि ते निर्धारित मुदतीमध्ये फेडावे लागेल.
नवी दिल्ली: पीपीएफ खाते दीर्घकालीन बचतीसाठी तसेच कर बचतीसाठी एक चांगला पर्याय आहे. त्यावर व्याजासोबत मॅच्युरिटीच्यावेळी मिळणाऱ्या पैशांवर कर लागत नाही. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर कपातीचा दावाही केला जाऊ शकतो. या फायद्यांव्यतिरिक्त, पीपीएफ खातेधारक त्याच्या क्रेडिटमधील पीपीएफ शिल्लक आधारित कर्जाचा लाभ घेऊ शकतो.
PPF योजनेअंतर्गत कर्ज खात्याच्या तिसऱ्या ते सहाव्या आर्थिक वर्षापर्यंत घेता येते. जर 2020-21 मध्ये खाते उघडले गेले तर 2022-23 पासून कर्ज घेता येईल. हे 36 महिन्यांच्या कालावधीसाठी असेल. म्हणजेच हे अल्प मुदतीचे कर्ज आहे आणि ते निर्धारित मुदतीमध्ये फेडावे लागेल.
व्याज दर
जर कर्जाची रक्कम 36 महिन्यांच्या मुदतीपूर्वी परत केली गेली तर लागू व्याज दर दरवर्षी 1 टक्के असेल, जो खूप कमी आहे. तथापि, जर 36 महिन्यांनंतर रक्कम परत केली गेली तर कर्जाच्या तारखेपासून 6 टक्के वार्षिक दराने व्याज आकारले जाईल.
किती कर्ज घेऊ शकता?
पीपीएफ खात्यात दुसऱ्या वर्षापर्यंत असणाऱ्या एकूम बॅलन्सच्या 25 टक्के कर्ज तुम्हाला मिळू शकते. पीपीएफ खात्यावरील कर्जासाठी अर्ज करण्यासाठी खातेदाराला फॉर्म डी भरावा लागतो. यामध्ये खाते क्रमांक आणि कर्जाची रक्कम नमूद करावी लागेल. यावर खातेदाराला आपली स्वाक्षरीही द्यावी लागेल. पीपीएफ खात्याचे पासबुक फॉर्मसह संलग्न करावे लागेल आणि आपले पीपीएफ खाते जेथे आहे त्या बँक/पोस्ट अधिकाऱ्यांना सादर करावे लागेल.
पीपीएफ खाते उघडण्यात कुठे आहे अधिक फायदा?
पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते उघडण्यापेक्षा बँकेत पीपीएफ खाते उघडणे अधिक फायदेशीर आहे. फक्त एवढेच नाही, जर आपल्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर आपण या बँकेत देखील हस्तांतरीत करू शकता. वास्तविक, ज्या बँकेत तुमचे आधीच बचत खाते आहे त्याच बँकेत जर तुम्ही खाते उघडले तर तुम्हाला बराच फायदा होईल. याद्वारे, त्यांना त्यांच्या खात्याचा तपशील मिळत राहिला आहे आणि ते नेट बँकिंगद्वारे देखील कनेक्ट करू शकतात. याद्वारे ग्राहक फोनमध्येच त्यांचे पीपीएफ खाते मॅनेज करू शकतात. सध्या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के व्याज मिळते. त्यात गुंतवणूकी केल्यावर तुम्हाला करात सूट मिळण्याचा लाभ मिळतो. मॅच्युरिटीला मिळालेला पैसाही करमुक्त आहे.
संबंधित बातम्या:
PPF मध्ये बचत करत असाल तर ही तारीख लक्षात ठेवा, होईल जबरदस्त फायदा
तुम्ही तुमच्या PF खाते आणि UAN ची माहिती नाहीये? मग ‘या’ ऑनलाईन टीप्सचा वापर करा
बंद पडलेले PPF खाते पुन्हा कसे सुरु कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया