PPF योजनेतून कोट्यधीश व्हा, ‘हा’ फॉर्म्युला जाणून घ्या
तुम्हाला PPF याविषयी माहिती आहे का? नसेल माहिती तर चिंता करू नका. याविषयी पुढे जाणून घ्या. PPF ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवून खूप चांगला नफा कमावू शकता. आज आम्ही तुम्हाला एका फॉर्म्युल्याबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही PPF स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता आणि निवृत्तीपूर्वी कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करू शकता.

तुम्हाला कोट्यधीश व्हायचं आहे का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. प्रत्येक व्यक्तीला आपली कमाई अशा ठिकाणी गुंतवायची असते जिथे पैसा सुरक्षित असेल आणि गुंतवणुकीवर पैशावर चांगला परतावाही मिळेल. अशा अनेक योजना आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून खूप चांगला नफा कमावू शकता.
यापैकीच एक योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF योजना. PPF ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवून खूप चांगला नफा कमावू शकता.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजना
PPF योजनेत तुम्ही दरमहिन्याला थोडी फार गुंतवणूक करून चांगला फंड जोडू शकता. या योजनेत तुम्ही वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंत म्हणजेच दरमहा 12,500 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. PPF योजनेत मिळणाऱ्या परताव्याबद्दल बोलायचे झाले तर या योजनेवर 7.1 टक्के व्याजदराने परतावा मिळतो. हा व्याजदर दर तिमाहीला उपलब्ध आहे. PPF योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षांचा आहे. 15 वर्षांनंतर तुम्ही ही योजना 5-5 वर्षांसाठी दोनदा वाढवू शकता.
PPF मधून निवृत्तीपूर्वी कोट्यधीश
PPF मधून कोट्यधीश होण्यासाठी तुम्हाला दरमहा PPF मध्ये 12,500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्हाला ही योजना 15 वर्षांनंतर 5-5 वर्षांसाठी 2 वेळा वाढवावी लागेल. समजा तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षापासून PPF मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असेल तर 15 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 22,50,000 रुपये होईल, ज्यावर तुम्हाला 18,18,209 रुपये व्याज मिळेल. अशा परिस्थितीत PPF मध्ये तुमच्याकडे 40,68,209 रुपये असतील. आता 5-5 वर्षांसाठी 2 वेळा मुदतवाढ द्यावी लागेल.
पुढील 5 वर्षात तुमचे 40,68,209 रुपये वाढून 66,58,288 रुपये होतील. तर एकदा मुदतवाढ दिल्यास तुम्हाला एकूण 1,03,08,015 रुपये मिळतील. अशा प्रकारे वयाच्या 55 व्या वर्षी तुमच्याकडे कोट्यवधींचा निधी असेल.
इतर बचत योजना कोणत्या आहेत, याची माहिती देखील पुढे जाणून घेऊया.
सोन्यात गुंतवणूक
आपल्या आर्थिक योजनेत सोन्याचा समावेश नक्की करा. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अशावेळी तुम्हीही सोन्यात थोडी गुंतवणूक केली पाहिजे.
म्युच्युअल फंड SIP
आपण आपल्या आर्थिक नियोजनात म्युच्युअल फंड SIP चा देखील समावेश करणे आवश्यक आहे. ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला नियमित गुंतवणूक करून मोठा फंड गोळा करू शकता. म्युच्युअल फंड SIP मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास कोट्यवधींचा निधीही जोडता येतो.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)