PVC Aadhaar Card: संपूर्ण कुटुंबाचा मजबूत जोड, एका मोबाईल क्रमांकावर संपूर्ण कुटुंबासाठी आधार कार्ड

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांसाठी आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पीव्हीसी आधार कार्ड आणले आहे. त्यानुसार, संपूर्ण कुटुंबासाठी एकाच व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरुन आधारकार्ड मागविता येईल.

PVC Aadhaar Card: संपूर्ण कुटुंबाचा मजबूत जोड, एका मोबाईल क्रमांकावर संपूर्ण कुटुंबासाठी आधार कार्ड
आधार कार्ड
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 8:25 AM

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांसाठी आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पीव्हीसी आधार कार्ड आणले आहे. आधार कार्ड हे (Aadhaar Card) भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे, अनेक ठिकाणी, सरकारी कार्यालयात, बँकिंग, पर्यटन अथवा इतर महत्वाच्या कामासाठी ओळखपत्र अनिवार्य असते. अशावेळी आधारकार्ड दाखवून आपले काम फत्ते होते. नागरीक आधारकार्ड स्वतःजवळ बाळगतात. अथवा मोबाईलमध्ये आधाराकार्ड डाऊनलोड केलेले असते. तर काळानुरुप आधारकार्ड ही बदलत आहे. आता सर्वसामान्यांच्या सोयीसाठी यूआयडीएआयने आधार पीव्हीसी कार्ड (Aadhaar PVC card) आणले आहे. अर्थात हे काही नवीन वा वेगळे कार्ड नाही. तर आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पीव्हीसी आधार कार्ड आणले आहे. यामध्ये डिजिटली साईन असलेले क्युआर कोड, फोटोग्राफ आणि इतर माहिती सुरक्षित जतन करण्यात आली आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आधार पीव्हीसी कार्ड हवे असेल, तर एक-एक करून अर्ज करण्याऐवजी एकाच वेळी संपूर्ण कुटुंबासाठी एकाच रजिस्ट्रर मोबाईल क्रमांकाद्वारे (Register Mobile) आधार पीव्हीसी कार्ड मागवू शकता.

ट्विटरवरुन दिली माहिती

तुम्ही एकाच मोबाईल नंबरच्या मदतीने संपूर्ण कुटुंबासाठी आधार पीव्हीसी कार्ड मागवू शकता, ही माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने त्यांच्या (@UIDAI) अधिकृत ट्विटर खात्याद्वारे देण्यात आली आहे. आधार पीव्हीसी कार्डसाठी कसा अर्ज करायचा. त्यासाठीची लिंक आणि इतर माहिती या ट्विटर हँडलवरुन नागरिकांसाठी देण्यात आली आहे. या माहितीआधारे तुम्ही ही पीव्हीसी आधार कार्ड स्वस्तात घरपोच मागवू शकता. त्यासाठी वेगवेगळे मोबाईल क्रमांक देण्याची गरज नाही. एकाच मोबाईल क्रमांकावरुन तुम्ही कुटुंबासाठी पीव्हीसी आधार कार्ड मागवू शकता. . पीव्हीसी आधार कार्ड हे संपूर्ण कुटुंबाचा मजबूत जोड ठरणार आहे.

how to Apply Aadhaar PVC card online, असे मिळवा कार्ड

आधार पीव्हीसी कार्डवर डिजिटल स्वाक्षरी केलेला सुरक्षित क्यूआर कोड देण्यात आला आहे, जो एकाधिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, तसेच या कार्डवरील आपले फोटो आणि इतर तपशीलांसह सुरक्षित आहे. या कार्डसाठी प्रत्येकी 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे कार्ड व्हर्च्युअल आयडी (Virtual ID) , आधार क्रमांक(Aadhaar number) किंवा एनरोलमेंट आयडीद्वारे (Enrolment ID) मागवता येईल. कसे ते जाणून घेऊयात..

1) सर्वप्रथम यूआयडीएआय किंवा https://uidai.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी

2) यानंतर साईटच्या होमपेजवर माय कॉन्टॅक्ट विभागात ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक अथवा 28 अंकी नोंदणी आयडी ( Enrolment ID) टाकावा लागेल.

3) यानंतर सिक्युरिटी कोड टाका आणि त्यानंतर रजिस्टर मोबाइल क्रमांक नसलेल्या बॉक्सच्या बाजूला असलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करा.

4) यानंतर नॉन-रजिस्टर किंवा कोणताही पर्यायी मोबाइल क्रमांक टाका आणि नंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा.

5) सबमिट बटण दाबा आणि ओटीपी टाकून पडताळणीची पायरी पूर्ण करा

6) यानंतर पेमेंट पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्या सोयीनुसार कोणत्याही माध्यमातून डेबिट किंवा क्रेडिट, यूपीआय किंवा नेटबँकिंगद्वारे पेमेंट करू शकता.

7) पेमेंट केल्यानंतर डिजिटल सिग्नेचर असलेली पावती आपोआप तयार होईल. ती तुम्ही पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करू शकता

इतर बातम्या:

जेलमध्ये जाऊ हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, सोमय्यांनी आरोप करताना नैतिकता पाळावी, अनिल परब यांचा टोला

Bajaj Discover 150 अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.