रेल्वे आरक्षणासंदर्भातील हा महत्वाचा नियम बदलला, प्रवाशांना होणार फायदा
indian railways reservation: आता ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट बुक केले आहे त्यांना या नव्या नियमाचा फटका बसणार नाही. 1 नोव्हेंबर 2024 पासून नवीन नियम लागू होणार आहे. 120 दिवसांच्या नियमानुसार 31 ऑक्टोबरपर्यंत केलेले बुकिंग कायम राहील. याचा अर्थ 31 ऑक्टोबरपर्यंत केलेल्या आरक्षणावर त्याचा परिणाम होणार नाही.
indian railways reservation: भारतीय रेल्वेने नियमित कोट्यवधी प्रवाशी प्रवास करतात. त्यात आरक्षण करुन प्रवास करण्यास जवळपास सर्वांचा प्रयत्न असतो. परंतु रेल्वे आरक्षण करण्यासाठी 120 दिवसांचा कालावधी होता. त्यामुळे अनेक गाड्यांचे तिकीट महिन्याभरापूर्वी वेटींगवर येत होते. दुसरीकडे बुकींग केलेले सर्व जण प्रवास करत नव्हते. यामुळे रेल्वेने 120 दिवसांचा असलेला हा नियम आता 60 दिवसांवर आणला आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
रेल्वेने का घेतला हा निर्णय
रेल्वेने म्हटले आहे की, 120 दिवसांच्या आरक्षणाच्या मुदतीत अनेक जण आपले आरक्षण रद्द करत होते. हा कालावधी खूप जास्त होता. या कालवधीत केले गेलेले 21 टक्के तिकीट रद्द होत होते. तसेच चार ते पाच टक्के लोक तिकीट रद्द करत नव्हते परंतु प्रवासही करत नव्हते. फक्त 13 टक्के लोक 120 दिवसांच्या कालावधीत तिकीट बुक करत होते. अनेक जण 45 दिवसांच्या कालावधीत तिकीट बुक करत होते.
प्रवाशांना होणार असा फायदा
आता ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट बुक केले आहे त्यांना या नव्या नियमाचा फटका बसणार नाही. 1 नोव्हेंबर 2024 पासून नवीन नियम लागू होणार आहे. 120 दिवसांच्या नियमानुसार 31 ऑक्टोबरपर्यंत केलेले बुकिंग कायम राहील. याचा अर्थ 31 ऑक्टोबरपर्यंत केलेल्या आरक्षणावर त्याचा परिणाम होणार नाही. नवीन नियमानुसार तिकीट रद्द करण्याचा कालावधी 60 दिवसांचा असणार आहे. प्रवाशांचे दुसरे नुकसान म्हणजे रेल्वे तिकिटांचे पैसे चार महिन्यांपूर्वी खर्च करावे लागत होते. आता इतक्या पूर्वी हे पैसे खर्च करावे लागणार नाही.
का केला कालावधी कमी
देशात लाखो लोक आहेत जे आपल्या शहरापासून अनेक किलोमीटर नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी जातात. त्यांचे नियोजन चार महिन्यांपूर्वी म्हणजे 120 दिवसांपूर्वी होणे शक्य नसते. तसेच काही वेळा लाखो विद्यार्थी सरकारी परीक्षा देण्यासाठी दुसऱ्या शहरात जातात. त्यापैकी बहुतेकांना तिकीट इतक्या लवकर बुक करणे शक्य होत नाही. विद्यार्थी आणि सामान्य नोकरदारांसाठी रेल्वेने आर्थिकदृष्ट्या सोईची आहे. तसेच अनेक मोठ्या सणांच्या वेळी ट्रेनमध्ये गर्दी खूप वाढते. त्यावेळी आरक्षण महिन्यभराआधी पूर्ण होते. या सर्व बाबींचा विचार करुन रेल्वेने कालावधी कमी केला आहे.