रेल्वेचे स्लीपर क्लासचे तिकीट बुक केले, पण प्रवास झाला AC कोचमधून, रेल्वेची ही सुविधा माहीत आहे का?
Railway Ticket Upgradation Scheme: तुम्ही स्लीपर कोचचे आरक्षण केले आहे. परंतु मेसज आल्यावर तुमची बर्थ एसी कोचमध्ये असते. त्यानंतर प्रवाशांना चांगलाच आनंद होतो. स्लीपर कोच तिकीटाच्या पैशांमध्येच एसी कोचचा प्रवास होतो. भारतीय रेल्वेने ही सुविधा विचारपूर्वक दिली आहे.
Railway Ticket Upgradation Scheme: भारतीय रेल्वे प्रवाशाचे सर्वात स्वस्त आणि आरामदायी साधन आहे. भारतीय रेल्वेतून रोज कोट्यवधी जण प्रवास करत असतात. या प्रवाशांसाठी रेल्वेकडून अनेक सुविधा आणि सवलती दिल्या जातात. परंतु त्याची माहिती अनेकांना नसते. भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या काही जणांना स्लीपर कोचचे तिकीट बुक केल्यावर एससीमधून प्रवास करण्याची संधी मिळते. हा लाभ मिळवण्यासाठी तिकीट बुक करताना फक्त एक काळजी घेणे गरजेचे असते.
रेल्वेने का दिली ही सुविधा
तुम्ही स्लीपर कोचचे आरक्षण केले आहे. परंतु मेसज आल्यावर तुमची बर्थ एसी कोचमध्ये असते. त्यानंतर प्रवाशांना चांगलाच आनंद होतो. स्लीपर कोच तिकीटाच्या पैशांमध्येच एसी कोचचा प्रवास होतो. भारतीय रेल्वेने ही सुविधा विचारपूर्वक दिली आहे. त्याचा फायदा काही जणांना होत असतो. कधी कधी रेल्वेत एसी फर्स्ट, सेकेंड आणि थर्डमधील सीट रिकामे राहून जाते. त्यामुळे रेल्वेचे नुकसान होते. यामुळे रेल्वेने ऑटो अपग्रेडेशन सुविधा सुरु केली आहे.
काय आहे ऑटो अपग्रेडेशन
ऑटो अपग्रेडेशन म्हणजे रेल्वेची अपर क्लासची सीट खाली राहिल्यावर खालच्या क्लासच्या प्रवाशांचे तिकीट अपग्रेड केले जाते. जर फर्स्ट क्लासमध्ये तीन सीट रिकाम्या आहेत आणि सेंकड क्लासमध्ये चार जागा रिक्त आहेत तेव्हा सेंकड क्लासमधील प्रवाशांना फर्स्ट क्लासमध्ये पाठवले जाते. त्यानंतर थर्ड क्लासमधील प्रवाशांना सेंकड एसीमध्ये पाठवले जाते. शयनयान श्रेणीतील प्रवाशांना थर्ड एसीमधील सीट दिली जाते. म्हणजेच स्लीपर क्लासच्या प्रवास एसी क्लासमध्ये होतो. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे लागत नाही.
तिकीट करताना घ्या ही काळजी
रेल्वेचे तिकीट ऑनलाईन किंवा ऑफलाईन बुक करताना ऑटो अपग्रेडेशन सुविधाचा फायदा घेण्यासंदर्भात एक पर्याय आरक्षणाच्या अर्जात दिला असतो. त्यावर टिकमार्क करण्याची गरज आहे. ऑनलाईन तिकीट किंवा ऑफलाईन तिकीट प्रणालीमध्ये ही सुविधा उपलब्ध असते. तुम्ही ऑटो अपग्रेडेशनला टीकमार्क केले नाही तर तुम्हाला त्या सुविधांचा फायदा मिळणार नाही.