काय सांगता विना इंटरनेट पाठवता येतील पैसे !, एकावेळी 200 रुपये तर एकूण 2000 रुपयांचा करता येईल व्यवहार

नवीन वर्षात तुम्हाला एकावेळी 200 रुपयांचा एकावेळचा व्यवहार आणि एकूण 2000 रुपयांपर्यंताचा व्यवहार पूर्णतः विना इंटरनेट करता येणार आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठीच नाही तर इंटरनेट स्पीड कमी असलेल्या भागासाठी ही क्रांतीकारी योजना ठरणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याविषयीचे नवीन नियम जाहीर केले आहेत. फीचर मोबाईलमध्ये ही ऑफलाइन पद्धतीने इंटरनेट सुविधेचा हा प्रयोग भारतात क्रांती घडविल्याशिवाय राहणार नाही हे नक्की 

काय सांगता विना इंटरनेट पाठवता येतील पैसे !, एकावेळी 200 रुपये तर एकूण 2000 रुपयांचा करता येईल व्यवहार
रिझर्व्ह बँक
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 7:41 AM

मुंबई :  विना इंटरनेट (Without internet) ग्राहकांना एकावेळी 200 रुपये तर एकूण 2000 रुपयांचा व्यवहार करता येणार आहे. फेस टू फेस (Face to Face) तंत्रज्ञानाचा वापर करुन हा व्यवहार करता येईल. अर्थात यासाठी दोन्ही पक्षांची उपस्थिती आवश्यक आहे. 200 रुपयांचा हा  व्यवहार ऑफलाईन  (Offiline Payment Transaction) असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासाठी पुढाकार घेतला आहे. व्यवहार सुधारणेवर भर देण्यातील ही पहिली पायरी आहे. ग्राहकांना सहजरित्या व्यवहार करता यावे, यासाठी कमी मूल्याधारित डिजिटल व्यवहाराचे नियम(small value digital payment) तयार करण्यात येत आहेत. 200 रुपये ही सध्याची त्याची कमाल मर्यादा आहे. ऑफलाईन पद्धतीने एकूण 2000 रुपयांची रक्कम समोरच्या व्यक्तीला तुम्ही पाठवू शकणार आहात.

यापूर्वीच ऑफलाईन व्यवहाराची चाचणी 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑफलाईन व्यवहारांसाठी नवे नियम तयार केले आहेत. या नियमातंर्गतच ऑफलाईन व्यवहाराची ही नवी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.या पायलट प्रकल्पाची यापूर्वीच चाचणी करण्यात आली आहे. सप्टेंबर 2020 ते जुलै 2021 या दरम्यान ऑफलाईन व्यवहाराची चाचणी करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सकारात्मक परिणामानंतर गेल्या वर्षी 6 ऑगस्ट रोजी याविषयीच्या पायलट योजनेला मंजूरी दिली होती. ऑफलाईन अथवा बिना  इंटरनेट व्यवहारांना चालना देण्यासाठी विशेष योजनेवर काम करण्याची आवश्यकतेवर या योजनेत भर देण्यात आला आहे. सध्या हा प्रकल्प अल्प किंमत असलेल्या व्यवहारांना समोर ठेऊन कार्यान्वीत करण्यात आला आहे. या व्यवहारांमुळे इंटरनेटची दादागिरी तर जिरेलच परंतू, कॅशलेस इकॉनॉमी अर्थात व्यवहारांसाठी प्रत्यक्षात नोटांचा वापर न करणारी अर्थव्यवस्था उभारणीला चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना या सुविधेचा सर्वाधिक लाभ होणार आहे. तसेच डोंगराळ आणि दुर्गम भागातील लाखो लोक या प्रकल्पामुळे कॅशलेस व्यवहार करण्यात सक्षम होतील यातील शंका नाही.

फीचर मोबाईलसाठी खास सुविधा

सध्या स्मार्टफोनचा जमाना असला तरी ग्रामीण भागात अनेक लोकांकडे सर्वसामान्य मोबाईल, फीचर मोबाईल आहेत. त्यामध्ये इंटरनेटचा वापर होत नाही. अशा लोकांना डिजिटल पेमेंट स्कीममध्ये जोडण्यासाठी रिझर्व्ह बँक पूर्वीपासूनच प्रयत्नात होती. जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार, 2019 मध्ये भारतातील 41 टक्के लोकसंख्येकडे इंटरनेट डाटाचा वापर होता. याचा अर्थ उर्वरीत 49 टक्के जनता इंटरनेटपासून कोसो दूर आहे. ही मोठी संख्या आहे. त्यामुळे फीचर मोबाईलमध्ये ही ऑफलाइन पद्धतीने इंटरनेट सुविधेचा हा प्रयोग भारतात क्रांती घडविल्याशिवाय राहणार नाही हे नक्की

कसा होईल व्यवहार

रिझर्व्ह बँकेने किमान 200 रुपयांचे व्यवहार ऑफलाईन केले आहेत.

एकावेळी 200 आणि संबधित डिव्हाइससाठी 2000 रुपयांचा व्यवहार होऊ शकेल

व्यवहार करतेवेळी दोन्ही पक्षांची उपस्थिती अनिवार्य आहे

ग्राहकाच्या अनुमतीशिवाय हा व्यवहार पूर्ण होणार नाही

ऑफलाईन व्यवहारासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड, मोबाईल वॅलेट आणि मोबाईल डिव्हाइसचा वापर होईल

दोन्ही पक्षाच्या उपस्थितीत हा व्यवहार संपूर्ण सुरक्षित असेल

या संपूर्ण व्यवहारासाठी इंटरनेट सेवेची आवश्यकता नाही

Authorised Payment System Operator and Payment System Participants या नियमांआधारे हा व्यवहार होईल

संबंधित बातम्या

आता ग्राहकच राजा, उत्पादनातील दोषाची बिनधास्त करा तक्रार , खटल्यांचा निकाल ही लागणार झटपट

Public Provident Fund: गुंतवणूक मंत्र: पीपीएफ सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह, वार्षिक 7.1% रिटर्न

असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड, नोंदणीची शेवटची तारीख काय, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.