AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI rules: फाटलेल्या नोट बदलण्यासाठी करावी लागणार नाही आता धावपळ, आरबीआयने केले नवीन नियम जाहीर !

बहुतेक वेळा आपल्याकडील असलेल्या नोटा कधी कधी फाटून जातात.नोट फाटल्यावर दुकानदार आपल्या कडून घेत नाही, अशा वेळी या फाटलेल्या नोटचे नक्की करायचे तरी काय? असा प्रश्न मनामध्ये येत असतो. ही फाटलेली नोट कोणी घेत नसल्यामुळे अनेकदा मानसिक त्रास सहन करावा लागतो.

RBI rules: फाटलेल्या नोट बदलण्यासाठी  करावी लागणार नाही आता धावपळ, आरबीआयने केले नवीन नियम जाहीर !
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 12:55 AM

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे एखादी फाटलेली नोट (torn note) असेल किंवा एखाद्या नोटेवर सेलोटेप लावलेली असेल तर अशा वेळी कोणताही दुकानदार तुमची नोट स्वीकारत नाही. ही फाटलेली नोट अनेकदा कोणी घेत नसल्यामुळे आपल्याला अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचा मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागतो परंतु ही फाटलेली नोट नेमकी आपल्याकडे ठेवायची का? जर तुमच्याकडे सुद्धा एखादी नोट फाटलेली असेल व एखाद्या नोटेवर सेलोटेप चिकटवलेला असेल तर अशा वेळी घाबरून जाऊ नका. कोणत्याही प्रकारची चिंता करू नका या माहितीचा उपयोग करुन तुम्ही भविष्यात अनेक समस्या दूर करू शकतात. तुम्हाला तुमच्या जुन्या नोटा बद्दल योग्य नवीन नोट मिळेल. नोट बदली करण्यासाठी आरबीआय(Reserve bank of India) ने काही नियम बनवले आहेत. हे नियम सर्वसामान्य लोकांना अद्याप ही माहिती नाहीये. चला तर मग आपण जाणून घेऊया बँकेबद्दलचे असे काही नियम.

हे आहेत बँकेचे नियम

भारतीय रिजर्व बँक ऑफ (RBI) च्या वर्ष 2017 मधील एक्सचेंज करेंसी नोट नियम नुसार जर तुम्हाला एटीएम मधून फाटलेली किंवा चीपकवलेली नोट मिळाल्यास तर अशावेळी या प्रकारच्या नोट तुम्ही सहजच बदली करू शकता आणि कोणतीही सरकारी बँक या नोटांना बदली करण्यास मनाई करू शकत नाही.

नोट बदलण्याच्या या आहेत काही पद्धती

तुम्हाला आरबीआयच्या अधिकृत ऑफिसमध्ये जाऊन तेथे या नोटा तुम्हाला जमा करायचे आहेत. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म भरल्यावर सहकारी बँक प्रायव्हेट बँक किंवा एखाद्या करन्सी चेस्ट तसेच आरबीआय यांनी अधिकृत केलेल्या एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही या नोटा बदलू शकता.

पूर्ण मिळतील पैसे

तुमची फाटलेली नोट आणि तुमच्या पैशांच्या स्थिती या गोष्टी अवलंबून असते की तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील की नाही. जर तुमचे पैसे थोड्या प्रमाणात फाटलेले असतील तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील परंतु जर नोट ची स्थिती खूपच खराब झालेली असेल जास्त प्रमाणामध्ये पैसे फाटले असतील तर अशा वेळी तुमच्या नोटेचे मूल्यांकन केले जाते आणि त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात.

अशाप्रकारे करा तक्रार

जर एखादी बँक तुमच्याकडे फाटलेली व चिपकवलेली नोट जमा करून घेण्यास मनाई करत असेल तर अशावेळी तुम्ही https://crcf.sbi.co.in/ccf/ under General Banking// Cash Related category या वेबसाईटवर जाऊन तक्रार करू शकतात. वरील लिंक ही स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम ची आहे. जर बँक नियमांचे उल्लंघन करते तर बँक अधिकाऱ्यांनी विरोधात योग्य ती कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. ग्राहकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर बँक ला दहा हजार रुपयांपर्यंत दंड सुद्धा द्यावा लागू शकतो.

इतर बातम्या :

IRCTC खात्याशी आधार कार्ड लिंक करा, तुम्ही महिन्यातून 6 नव्हे तर रेल्वेची 12 तिकिटे बुक करू शकता, कसे ते जाणून घ्या

पॉलिसी मॅच्युरिटीनंतर किती कर द्यावा लागतो? आयुर्विम्याबाबत जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण गोष्टी

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...