आरबीआयने दिला सुखद धक्का, UPI व्यवहाराची वाढली मर्यादा

UPI Payment | भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नही. पण UPI पेमेंटबाबत दिलासा दिला आहे. आरबीआयने युपीआय व्यवहाराची मर्यादा आता 1 लाखांहून थेट 5 लाख रुपये केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. या कामासाठी ही सुविधा मिळणार आहे. प्रत्येक व्यवहारासाठी ही सुविधा नाही.

आरबीआयने दिला सुखद धक्का, UPI व्यवहाराची वाढली मर्यादा
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 4:36 PM

नवी दिल्ली | 8 डिसेंबर 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीने पुन्हा एकदा दिलासा दिला. रेपो दर जैसे थे ठेवले. आरबीआयने सलग पाचव्यांदा हा चमत्कार केला. अर्थात रेपो दरात कपात न झाल्याने ग्राहकांना, कर्जदारांना वाढीव दराने ईएमआय अजूनही भरावाच लागणार आहे. त्यात वाढ झाली नाही हाच मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आरबीआयने युपीआय पेमेंटविषयी एक जोरदार निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ग्राहकांना आता 1 लाखांहून थेट 5 लाख रुपयांपर्यंतचा व्यवहार युपीआयद्वारे करता येईल. पण ही सुविधा सर्रास सर्वच युपीआय व्यवहारांसाठी लागू नाही. काही व्यवहारांसाठीच ही सुविधा लागू करण्यात आली आहे.

याठिकाणी होईल उपयोग

देसात युपीआय ट्रान्झॅक्शनमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दर महिन्याला युपीआय व्यवहारांची संख्या वाढत आहे. आता त्यात आरबीआयने वापरकर्त्याला एक मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने युपीआयमधून व्यवहाराची मर्यादा 1 लाखांहून थेट 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. त्यानुसार, रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये युपीआय व्यवहार करताना ही मर्यादा वाढविण्यात आली आहे. आरबीआयने युपीआय ऑटो पेमेंटची मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे.

हे सुद्धा वाचा

केवळ यासाठी वाढली मर्यादा

आरबीआयच्या या सुविधेचा लाभ केवळ हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांना मिळेल. या ठिकाणी युपीआय पेमेंटच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येईल. त्यामुळे युपीआयचा वापर वाढेल असे आरबीआयने स्पष्ट केले. यामुळे अनेकांना आता शाळा, महाविद्यालयाचे शुल्क सोप्यारित्या युपीआयच्या माध्यमातून करता येईल. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कुठलाच बदल केला नाही. आरबीआयने रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवला. पण आरबीआयच्या या निर्णयामुळे स्वस्त कर्ज मिळण्याच्या ग्राहकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.

UPI Fraud ला पायबंद

  • केंद्र सरकाकडून लवकरच नवीन उपाय
  • UPI Fraud Alert तुम्हाला करणार सतर्क
  • युपीआय पेमेंट फसवणूक टाळण्यासाठी खास अलर्ट सिस्टिम
  • 5000 रुपयांपेक्षा अधिक डिजिटल पेमेंटसाठी रॅपिड अलर्ट सिस्टिम
  • ग्राहकाला व्हेरिफिकेशन मॅसेज अथवा कॉल येणार
  • त्याला हा व्यवहार सुरुक्षित वाटल्यास पुढील प्रक्रिया पूर्ण होणार
  • देशभरातील फ्रॉडसंबंधीत 70 लाख मोबाईल क्रमांक केले बंद
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.