भविष्यातील कटकट टाळण्यासाठी हा बदल हवाच, वाहन नावावर करण्याची झंझट छुमंतर, या पद्धतीने करा मोटर वाहन मालकी हस्तांतरण  

जोपर्यंत कायदेशीररित्या वाहन तुमच्या नावावर ट्रान्सफर करण्यात येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या वाहनाचे कायदेशीर मालक ठरत नाहीत. तेव्हा वाहन रजिस्ट्रेशन ट्रान्सफर करण्यासाठी अडचण येत असतील तर या सोप्या पद्धतीने तुम्ही मोटार वाहन मालकी हस्तांतरण प्रक्रिया करुन कायदेशीररित्या वाहनाचे मालक होऊ शकता. 

भविष्यातील कटकट टाळण्यासाठी हा बदल हवाच, वाहन नावावर करण्याची झंझट छुमंतर, या पद्धतीने करा मोटर वाहन मालकी हस्तांतरण  
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 9:06 AM

नवी दिल्ली : जूनी गाडीची विक्री अथवा ती खरेदी करत असाल तर अनेकदा रजिस्ट्रेशन ट्रान्सफर करण्यासाठी त्याला अडचणींचा सामना करावा लागतो. कोणतंही जूनं वाहन खरेदी केल्यावर आरसी तुमच्या नावावर करुन घ्यावी लागते. त्याशिवाय तुम्ही त्या गाडीचे कायदेशीर मालक होत नाही. मोटार वाहन मालकी हस्तांतरण केल्याशिवाय तुम्हाला वाहनावर हक्क सांगता येत नाही. अपघातावेळी तर अनेक क्लिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. तेव्हा भविष्यातील त्रासापासून वाचण्याासाठी वेळीच हा बदल करणे गरजेचे आहे.

ऑफलाईन प्रक्रिया अशी

यासाठी तुम्हाल नजीकच्या परिवहन कार्यालयात धाव घ्यावी लागेल. थेट अर्ज करुन आरसी बूक तुमच्या नावावर करता येईल. गाडीसंबंधीची सर्व कागदपत्रे शुल्क द्यावे लागेल. त्यानंतर संबंधित तारखेला कार्यालयात हजर रहावे लागेल. कोणत्याही वाहनाची खरेदी-विक्रीच्या 14 दिवसानंतर मोटार वाहन मालकी हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी असा कायदा सांगतो. 30 दिवसानंतर आरसी ट्रान्सफर होऊन स्मार्ट कार्डच्या रुपात वाहनधारकाच्या पत्त्यावर पाठविली जाते. जर वाहन एका राज्यातून दुस-या राज्यात हस्तांतरीत करायचे असेल तर अर्ज क्रमांक 28 चा वापर करण्यात येतो.

असे करा ऑनलाईन हस्तांतरण

वाहन मालकी हक्क हस्तांतरणासाठी सर्वात अगोदर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाईटवर (Ministry of Transport and Highway) (https://parivahan.gov.in/parivahan/)  भेट द्यावी लागेल

या संकेतस्थळावर तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आदी माहिती टाकून अकाऊंट/ खाते तयार करावे लागेल.

खाते तयार केल्यानंतर  Online Service वर क्लिक करावे लागेल. यामध्ये Vehicle Related service वर क्लिक करा.

संबंधित Application Form मध्ये वाहनाचा रजिस्ट्रेशन क्रमांक, चेसीस क्रमांक टाकून ओटीपी क्रिएट करा. नोंद केलेल्या  मोबाईल क्रमांकवर ओटीपी प्राप्त होईल.

ओटीपी (OTP) टाकल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. Transfer of Ownership वर क्लिक करा, त्यानंतर सबमिट (Submit ) बटन दाबा.

सबमिट बटन दाबल्यानंतर Form समोर येईल. त्यामध्ये वाहनाची आणि रजिस्ट्रेशनसंबंधीची माहिती द्यावी लागेल.

त्यानंतर हा अर्ज पुन्हा सबमिट करावा लागेल. त्यानंतर परिवहन कार्यालयात संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी तारीख घ्यावी लागेल. शुल्क अदा केल्यानंतर कागदपत्रे जमा केल्यानंतर तुमची पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.

‘हे’ Form करावे लागतात जमा

आरटीओ कडून वाहन खरेदी-विक्री करताना हस्तांतरणासाठी काही Form देण्यात येतात. त्यामध्ये Form 29,30, 35,36 हे असतात. Form 29 आणि 30 सेल लेटर असतात तर Form क्रमांक 30 हा Hypothecation Terminated संबंधित असतो. यावर वाहन खरेदीदाराचे हस्ताक्षर घ्यावे लागते आणि परिवहन कार्यालयात ते जमा करावे लागते. त्यानंतर मोटार वाहन मालकी हस्तांतर प्रक्रिया पूर्ण होेते.

संबंधित बातम्या

IPO Tracker | मेडिकेअर लिमिटेडचा लवकरच आयपीओ, 2 हजार कोटींचे उद्दिष्ट

पिळवणूकीविरोधात असंघटित कामगारांच्या आवाजाला धार, मोदी सरकारचे ‘समाधान’कारक पोर्टल

गुरु-शिष्याची बँकिंगमध्ये एन्ट्री, झुनझुनवाला-दमानींची ‘या’ बँकेत भागीदारी?

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.