Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupees : रुपयाचं डॉलरसमोर लोटांगण, रुपया एवढा दचकला कशामुळे?

Rupees : रुपया पुन्हा गडगडला. डॉलरपुढे गेल्या तीन चार महिन्यात रुपयासारखा का लोटांगण घेत असेल बरं..

Rupees : रुपयाचं डॉलरसमोर लोटांगण, रुपया एवढा दचकला कशामुळे?
रुपयाची घसरगुंडीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 11:49 AM

नवी दिल्ली : डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपयाची पुन्हा घसरगुंडी उडाली. 22 सप्टेंबर 2022 रोजी गडग़डण्यात रुपयाने नवा रेकॉर्ड (All Time Low) तयार केला. सुरुवाती व्यापारी सत्रात रुपया (Rupees) 51 पैशांच्या घसरणीसह 80.47 वर स्थिरावला. सततच्या व्याजदर वाढीचा हा परिणाम समजण्यात येत आहे.

अमेरिकन केंद्रीय फेडरल रिझर्व्ह बँकेने तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ केली. त्याचा फायदा डॉलरला झाला. त्यामुळे डॉलर मजबूत झाला. तर भारतीय रुपयाला त्याचा फटका बसला. रुपया निच्चांकी स्तरावर घसरला.

गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारी सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत 80.27 होता. त्यानंतर अचानक त्याला घेरी आली. तो गडगडला. सुरुवातीच्या सत्रातच रुपया 80.47 पर्यंत गडगडला. हा आतापर्यंतचा सर्वात निच्चांकी स्तर आहे.

हे सुद्धा वाचा

बुधवारी रुपया मजबूत स्थिती होता. डॉलरच्या तुलनेत रुपया 79.96 स्तरावर बंद झाला. कालच्या व्यापारी सत्रात रुपया चांगल्या स्थितीत होता. तो 79.79 स्तरावर व्यापार करत होता. 20 जुलै रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरुन 80.05 वर पोहचला होता. त्यानंतर रुपया सावरला होता.

डॉलर इंडेक्स सध्या मजबूत पातळीवर आहे. त्यामुळे भारतीय रुपया आणि अन्य आशियातील चलन कमकूवत दिसत आहेत. डॉलर च्या तुलनेत यूरो पण गेल्या 20 वर्षांतील निच्चांकी स्तरावर म्हणजे 0.9822 वर पोहचला आहे.

जर वेळीच उपाय योजना केल्या नाहीत तर रुपयाची घसरगुंडी सुरुच राहिल. तज्ज्ञांच्या मते, रुपयाची अवस्था पाहता, तो लवकरच 81 ते 82 असा नवा रेकॉर्ड करु शकतो.

अमेरिकन बँकेने व्याजदरात 0.75% टक्के वृद्धी केली आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात येईल असे मानण्यात येत आहे. आता रुपयाची घसरण थांबवण्यासाठी RBI काय पाऊल टाकते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.