1 ऑगस्टपासून ‘या’ बँकांमध्ये जास्त बॅलन्स ठेवण्याची सक्ती
Banks | 1 ऑगस्टला शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सहावा हप्ता मिळणार आहे. 1 ऑगस्टला मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा सहावा हप्ता जमा करेल. सरकारने या योजनेत आतापर्यंत देशातील 9.85 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट आर्थिक लाभ दिला आहे. या योजनेचा पाचवा हप्ता 1 एप्रिल 2020 ला आला होता.
मुंबई: उद्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजे 1 ऑगस्टपासून आर्थिक व्यवहारासंबंधीच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या-आमच्यावर होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ केली आहे. याशिवाय, नॅशनल ऑटोमेटड क्लिअरिंग हाऊसच्या (NACH) नियमांतही बदल झाले आहेत. त्यामुळे तुमचा पगार किंवा पेन्शन सुट्टीच्या दिवशीही खात्यामध्ये जमा होईल.
ATM मधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ
आता भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमात बदल केल्यामुळे इंटरचेंज शुल्क वाढले आहे. परिणामी आर्थिक व्यवहारांवर जादा शुल्क आकारले जाणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. RBI ने इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरुन 17 रुपये इतके केले आहे. तर बिगरआर्थिक सेवांसाठीचे शुल्क 5 रुपयांवरुन वाढवून 6 रुपये इतके करण्यात आले आहे. RBI च्या नियमानुसार प्रत्येक ग्राहकाला एटीएमच्या माध्यमातून महिन्याला पाच व्यवहार विनाशुल्क करता येतात. यामध्ये अन्य बँकांच्या एटीएमचा वापर करणेही ग्राह्य ठरले जाते.
पीएम किसानचा सहावा हप्ता
1 ऑगस्टला शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सहावा हप्ता मिळणार आहे. 1 ऑगस्टला मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा सहावा हप्ता जमा करेल. सरकारने या योजनेत आतापर्यंत देशातील 9.85 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट आर्थिक लाभ दिला आहे. या योजनेचा पाचवा हप्ता 1 एप्रिल 2020 ला आला होता.
या बँकांमध्ये जास्त बॅलन्स ठेवणं गरजेचं
रोख रकमेचा व्यवहार आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बँकांनी 1 ऑगस्टपासून ग्राहकांच्या बँक खात्यात जास्त डिपॉझिट ठेवणे गरजेचे असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), अॅक्सिस बँक (Axis Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra bank) आणि आरबीएल बँकेचा (RBL Bank) समावेश आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सेव्हिंग खातेधारकांना मेट्रो आणि शहरी भागात कमीत कमी 2,000 रुपये ठेव ठेवणं आवश्यक आहे. ही रक्कम आधी 1,500 रुपये होती. या रकमेपेक्षा कमी बॅलन्स असेल तर मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, अर्ध-शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात 20 रुपये प्रति महिना शुल्क आकारलं जाणार आहे.
सुट्टीच्या दिवशीही पगार बँक खात्यात जमा होणार
1 ऑगस्टपासून पेन्शन, वेतन आणि ईएमआय यासारख्या महत्वपूर्ण व्यवहारांसाठी सुट्टी असल्यास ताटकळत राहावे लागणार नाही. रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटड क्लिअरिंग हाऊसच्या (NACH) नियमांत बदल केले आहेत. NACH ही यंत्रणा NPCI कडून हाताळली जाते. या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डिव्हीडंट, व्याज, वेतन यासारखे व्यवहार पार पडतात. सध्या NACH ही यंत्रणा बँका सुरु असतानाच काम करते. परंतु 1 ऑगस्टपासून ही यंत्रणा सुट्टीच्या दिवशीही कार्यरत राहील.
आयसीआयसीआय बँकेतून पैसे काढणे झाले महाग
आयसीआयसीआय बँकेकडून रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेकबुक शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. तुम्ही एका महिन्यात फक्त चारवेळाच बँक खात्यामधून पैसे काढू शकता. त्यापेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये द्यावे लागतील. तसेच एका महिन्यात केवळ एक लाख रुपयांची ट्रान्झेक्शन लिमीट ठेवण्यात आली आहे. यापेक्षा अधिक रक्कम काढायची असल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
संबंधित बातम्या:
आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, एटीएममध्ये जाण्याआधी जाणून घ्या नवा नियम
ICICI आणि SBI कडून कार्डलेस सुविधा सुरु, पैसे कसे काढणार?
ATM मधून बाहेर पडण्याअगोदर चेक करा बॅलन्स, ट्रान्झॅक्शन फेल झालं तर बसतोय एवढा भुर्दंड!