20 वर्षांनंतर दर महिना 1.5 लाख रुपये कमवायचेत? जाणून घ्या किती गुंतवणूक करणं गरजेचं

तुम्ही एफडी, पीपीएफ, पोस्ट ऑफिस आरडी इत्यादींद्वारे पैसे कमवू शकता. पण या योजनांमुळे भविष्यात तुम्हाला महागाईला तोंड देता येणार नाही.

20 वर्षांनंतर दर महिना 1.5 लाख रुपये कमवायचेत? जाणून घ्या किती गुंतवणूक करणं गरजेचं
बचत खात्यावर सर्वाधिक व्याज
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 11:34 AM

मुंबई : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हे धोकादायक मानले जाते. पण जर एखादी व्यक्ती दीर्घ काळासाठी म्युच्युअल फंडमध्ये पैशांची गुंतवणूक करत असेल तर मग ही जोखीम बर्‍याच प्रमाणात कमी होते. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही एफडी, पीपीएफ, पोस्ट ऑफिस आरडी इत्यादींद्वारे पैसे कमवू शकता. पण या योजनांमुळे भविष्यात तुम्हाला महागाईला तोंड देता येणार नाही. या योजनांमध्ये दिला जाणारा व्याजदर हा महागाईच्या दरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे बचतीवर अधिक पैसे मिळवण्यासाठी इक्विटी फंडामध्ये पैशाची गुंतवणूक करणे योग्य ठरते. मात्र इक्विटी फंडमध्ये तुम्ही 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली तरच ती फायदेशीर ठरते.

जर तुम्ही यात 15 वर्षांसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला जमा वार्षिक रकमेवर 10-12 टक्के परतावा मिळतो. हा दर महागाई दराचा सामना करण्यासाठी पुरेसा आहे. विशेष म्हणजे याद्वारे तुम्हाला 4-5 टक्क्यांपर्यंत कमाई देखील जमा होत राहील. जे पुढील 20 वर्षांत सेवानिवृत्त होणार आहेत त्यांनी आता याबाबतचे योजना आखली पाहिजे. त्या काळातील खर्च लक्षात घेऊन गुंतवणूकीच्या साधनांचा विचार केला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा तुमच्या हातात एक निश्चित मासिक उत्पन्न कसे मिळेल? याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

महागाई दरावर लक्ष ठेवणे गरजेचे

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही सेवानिवृत्ती निधीसाठी योजना आखत असतात, तेव्हा महागाई दर नेहमी लक्षात ठेवा. सध्या एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाला दरमहा घरगुती खर्चासाठी 40,000 रुपयांची गरज असते. जर आपण 20 वर्षानंतर महागाईचा दर अंदाज केला तर तो 6-7 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. यानुसार 40,000 रुपयांचा आजचा खर्च 20 वर्षांनंतर 1.25 लाख किंवा 1.50 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. हा दर एसबीआय म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटरनुसार आहे. यानुसार, 20 वर्षानंतर जर एखाद्या व्यक्तीला 1.25 लाख ते 1.5 लाख रुपयांची गरज भासत असेल तर ते नक्कीच उपयुक्त ठरेल.

तज्ज्ञांचे म्हणणं काय?

जर एखाद्याने 20 वर्षांसाठी 50 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि गुंतवणूकदाराला त्यावेळी 1.5 लाख रुपये कमवायचे असतील तर त्याला 10-12 टक्के परतावा निश्चित मिळतो. त्यामुळे त्याच्याकडे चांगली रक्कम जमा होऊ शकते. विशेष म्हणजे पुढील 20 वर्षानंतर 50 लाख रुपयांची गुंतवणूक जवळपास 3.6 कोटी इतकी होईल. तसेच जर आपण गुंतवणूक थोडीशी वाढविली तर ती 5.3 कोटींवर जाऊ शकते. त्यानंतर वार्षिक पैसे काढण्याचे दर 4 टक्के इतकाच राहिला तर आपण 1.2 लाख ते 1.7 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा करू शकतो.

हे फंड ठरतील फायदेशीर 

ही कमाई सरासरी दीड लाख रुपये इतकी असेल. त्यासाठी आतापासून 50 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, त्यानंतर 20 वर्षानंतर 1.5 लाखांचे उत्पन्न मिळेल. इक्विटी फंडामध्ये 50 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास  तुम्हाला एकत्र  1.25 लाखापासून 1.5 लाख रुपये एकरकमी मिळतील. हे तुमचे मासिक उत्पन्न असेल. एचडीएफसी बॅलन्स्ड फंड किंवा आयसीआयसीआय बॅलन्स्ड अडव्हांटेज फंड यातही तुम्ही गुंतवणूक करु शकता. हे दोन्हीही चांगले पर्याय आहेत. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराची इच्छा असेल तर आदित्य बिर्ला सन लाइफ इक्विटी अ‍ॅडव्हान्टेज आणि एसबीआय फ्लेक्सी कॅपमध्ये पैसे जमा करू शकतो.

(Saving and Investment How much money should invest to get 1 5 lakh per month after 20 years)

संबंधित बातम्या : 

Petrol Diesel Price: पुढच्या महिन्यापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय

बचत खाते, कर्ज किंवा एफडीवर व्याज मिळवत असाल तर जाणून घ्या किती कर भरावा लागणार?

आता फक्त मोबाईल नंबरवरून UPI मार्फत पैसे पाठवा, ‘या’ बँकांची विशेष सेवा

एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.