SBI Alert ! दर महिना 10 हजार रुपये कमाई करायची? मग आजच गुंतवा ‘या’ योजनेत पैसे

एसबीआय Annuity योजनेत (SBI Annuity Scheme) गुंतवणूक करून आपण दरमहिना चांगले पैसे कमवू शकता. (SBI Annuity Scheme Now you can earn Rs 10,000 per month through this scheme)

SBI Alert ! दर महिना 10 हजार रुपये कमाई करायची? मग आजच गुंतवा 'या' योजनेत पैसे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स दिल्यात. तुम्ही सवलतीच्या दरातील कर्जापासून ते विशेष ठेवी योजनांपर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 2:38 PM

SBI Annuity Scheme मुंबई : आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला आपले मासिक उत्पन्न वाढवायचे असते. यासाठी काही लोक नोकर्‍या बदलण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण गुंतवणूक करतात. जर तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुम्हाला अशा काही योजनांची माहिती देत आहेत. ज्यामुळे तुम्हाला दर महिना निश्चित उत्पन्न मिळू शकते. त्यानुसार एसबीआय Annuity योजनेत (SBI Annuity Scheme) गुंतवणूक करून आपण दरमहिना चांगले पैसे कमवू शकता. (SBI Annuity Scheme Now you can earn Rs 10,000 per month through this scheme)

किती कालावधीसाठी गुंतवणूक?

SBI च्या या योजनेत 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवणूकीवरील व्याज दर निवडलेल्या कालावधीच्या मुदत ठेवाप्रमाणेच असतील. म्हणजे समजा तुम्ही पाच वर्षांसाठी निधी जमा केला, तर तुम्हाला पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर लागू असलेल्या समान व्याजदराने व्याज मिळेल. या योजनेचा लाभ भारतातील कोणताही नागरिक घेऊ शकतो.

व्याज किती?

आपण SBI च्या सर्व शाखांकडून तुम्ही Annuity Scheme योजनेत गुंतवणूक करु शकता. याची प्रारंभिक किंवा किमान रक्कम ही 25 हजार रुपये आहे. एसबीआय कर्मचारी आणि माजी कर्मचार्‍यांना यात 1 टक्के अधिक व्याज मिळतो. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के अधिक व्याज दिले जाईल. तसेच Term Deposit चा व्याज दर देखील या योजनेवर लागू होतो.

बचत खात्यापेक्षा अधिक चांगले उत्पन्न

तुम्ही या योजनेत रक्कम जमा केल्याच्या पुढील महिन्यापासून ठरलेल्या तारखेला तुम्हाला एन्यूटी दिली जाईल. ही रक्कम टीडीएस वजा केल्यानंतर बचत खाते किंवा चालू खात्यात वर्ग केली जाईल. एकरकमी रकमेवर चांगले रिटर्न्स मिळविण्यासाठी ही चांगली योजना आहे. इतकेच नव्हे तर एका विशिष्ट परिस्थितीत एन्यूटीच्या शिल्लक रकमेच्या 75 टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट / कर्जाची रक्कम घेता येते. बचत खात्यापेक्षा Annuity Scheme योजना ही अधिक चांगले उत्पन्न देते.

दरमहिना मिळतील 10 हजार रुपये

जर एखाद्या गुंतवणूकदाराला दरमहा दहा हजार रुपये उत्पन्न हवे असेल तर त्यासाठी गुंतवणूकदाराला 5 लाख 7 हजार 965 रुपये आणि 93 पैसे जमा करावे लागतील. जमा केलेल्या रक्कमेवर तुम्हाला 7 टक्के व्याजदराचा परतावा मिळेल. ज्यामुळे गुंतवणूकदार दरमहा सुमारे 10 हजार रुपये कमवू शकतो. (SBI Annuity Scheme Now you can earn Rs 10,000 per month through this scheme)

संबंधित बातम्या : 

Job News: तरुणांसाठी खुशखबर! भारतातील टॉप 5 आयटी कंपन्यांमध्ये 96 हजार नोकऱ्या

कोरोना काळात भारतीयांनी सर्वात जास्त पैसे स्विस बँकेत टाकले, 13 वर्षांचा विक्रम मोडला

सरकारच्या ‘या’ योजनेत महिन्याला फक्त 55 रुपये द्या आणि 36 हजार रुपये पेंशन मिळवा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.