SBI Home Loan : एसबीआयचा ग्राहकांना मोठा झटका, होम लोन, कार लोनच्या व्याज दरात वाढ
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने (SBI) आपल्या ग्राहकांना आता आणखी एक धक्का दिला आहे. एसबीआयने आपल्या होम लोन (Home Loan) आणि कार लोनच्या (Car Loan) व्याज दरात वाढ केली आहे. 15 एप्रिलपासून सुधारित व्याजदर लागू करण्यात आले आहेत.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने (SBI) आपल्या ग्राहकांना आता आणखी एक धक्का दिला आहे. एसबीआयने आपल्या होम लोन (Home Loan) आणि कार लोनच्या (Car Loan) व्याज दरात वाढ केली आहे. 15 एप्रिलपासून सुधारित व्याजदर लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडियाचे होम लोन आणि कार लोन महाग झाले आहे. बँकेकडून लोनच्या व्याज दरात 0.10 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर कोणत्या लोनवर किती व्याज दर वाढवण्यात आले आहेत. याची सविस्तर माहिती देण्यात आली असून, ही व्याज दरवाढ 15 एप्रिलपासून लागू झाल्यचे सांगण्यात आले आहे. बँकेने होम लोनचे दर वाढवल्याने याचा मोठा फटका हा नव्याने होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना बसणार आहे. व्याज दर वाढीमुळे ईएमआयच्या हफ्त्यात देखील वाढ होणार आहे. आधीच महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल आणि जवळपास सर्वच इंधनाचे दर गगनला भिडले आहेत. दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर देखील वाढले आहेत. आता त्यात भरीसभर म्हणजे बँका देखील आपल्या विविध कर्जाच्या व्याज दरात वाढ करताना दिसत आहेत.
व्याज दरात नक्की किती वाढ?
एसबीआयकडून आपल्या ग्राहकांना पूर्वी 6.65 टक्के व्याज दराने गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते. त्यामध्ये 0. 10 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता होम लोनचा व्याज दर 6.75 टक्के करण्यात आला आहे. तर पूर्वी कार लोन 6.95 टक्क्यांनी उपलब्ध करून देण्यात येत होते. त्यामध्ये 0. 10 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने ते 7.05 टक्क्यांवर पोहोचले आहे. होम लोन आणि कार लोन महागल्याने आता ग्राहकांना घर आणि गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधिक पैसे मोजावे लागणार आहेत. विविध बँकांकडून व्याज दरात वाढ करण्यात येत असल्याने महागाईत भर पडत आहे.
बँक ऑफ बडोदाकडून व्याज दरात वाढ
दरम्यान दुसरीकडे बँक ऑफ बडोदाकडून देखील MCLR वर 0.05 टक्के व्याज दराची वाढ करण्यात आली आहे. नवे दर 12 एप्रिलपासून लागू झाल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले. बँकेकडून देण्यात येत असलेल्या माहितीनुसार एक वर्षाच्या MCLR ला वाढवून 7.35 टक्के करण्यात आले आहे. यासोबतच अनेक बँकांनी पर्सन लोनवरील व्याज दर देखील वाढवले आहेत. सध्या अनेक बँकांकडून पर्लनल लोनवर अव्वाच्या सव्वा कर्ज आकारले जात आहे.
संबंधित बातम्या
बेस्टतर्फे आता ”टॅप इन टॅप आऊट ” सुविधेचा लाभ, सुट्ट्या पैशांच्या कटकटीपासून प्रवाशांची मुक्तता
Air Conditioner : एसीची हवा महागणार, जीएसटीत 10 टक्के वाढ विचाराधीन; लवकरच निर्णय