या आयटी कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना केले मालामाल; एका वर्षात 200 टक्के रिटर्न्स
Share Market | सध्या शेअर बाजारात अशाच एका आयटी कंपनीची जोरदार चर्चा सुरु आहे. बंगळुरूस्थित Persistent Systems कंपनीने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदरांना तब्बल 200 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
मुंबई: कोरोना काळात आयटी कंपन्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दीड वर्षात अनेक आयटी कंपन्यांच्या नफा कित्येक पटींनी वाढला आहे. साहजिकच यामुळे या कंपन्यांचे भांडवली बाजारातील मूल्यही तितकेच वाढले आहे. त्यामुळे भांडवली बाजारात आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळताना दिसत आहे.
सध्या शेअर बाजारात अशाच एका आयटी कंपनीची जोरदार चर्चा सुरु आहे. Persistent Systems कंपनीने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदरांना तब्बल 200 टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात Persistent Systems च्या एका समभागाची किंमत 1166 रुपये इतकी होती. मात्र, वर्षभरानंतर या कंपनीच्या समभागाने 3652 रुपयांची पातळी गाठली आहे. याचा अर्थ या कंपनीने अवघ्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 200 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
पर्सिस्टंट कंपनीच्या शेअरमध्ये आता गुंतवणूक करावी का?
कोरोना काळात इतर माहिती व तंत्रज्ञान कंपन्यांप्रमाणे (आयटी) Persistent Systems च्या महसूलात वाढ झाली आहे. त्यावरुन कंपनीची सेवा आणि नेतृत्त्व चांगले असल्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी ऑर्गेनिक रेवेन्यू ग्रोथमध्ये Persistent Systems इतर आयटी कंपन्यांपेक्षा पुढे जाईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. तसेच कंपनीचा नफा वाढत राहिल्यास समभागांच्या किंमतीमध्येही तेजी राहील, असे सांगितले जात आहे.
महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स
सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.
गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड
यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.
संबंधित बातम्या:
Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स