शेअर मार्केटमध्ये घसरणीचं सत्र, सेन्सेक्स 550 अंकांनी घसरला; पेटीएम डाउन!

सेन्सेक्स मध्ये 550 अंकांची घसरण झाली. निफ्टी 17100 अंकांच्या नजीक बंद झाला. बँक आणि फायनान्शियल शेअर मध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला.

शेअर मार्केटमध्ये घसरणीचं सत्र, सेन्सेक्स 550 अंकांनी घसरला; पेटीएम डाउन!
मार्केटमध्ये पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 6:32 PM

मुंबई- देशांतर्गत शेअर बाजारात (SHARE MARKET UPDATE) आज घसरणीचं चित्र दिसून आलं. आज (सोमवार) शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्स मध्ये 550 अंकांची घसरण झाली. निफ्टी 17100 अंकांच्या नजीक बंद झाला. बँक आणि फायनान्शियल शेअर मध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला. दोन्ही निर्देशांकात 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ऑटो निर्देशांकात 1 टक्के घसरण झाली. एफएमसीज निर्देशांकात 1.5 टक्क्यांहून अधिक, आयटी निर्देशांकात 0.75 आणि रिअल्टी निर्देशांकात 0.70 टक्के घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्सवर 30 पैकी 26 शेअर्समध्ये घसरण झाली एचडीएफसी बँक (HDFCBANK), सन फार्मा (SUNPHARMA), एनटीपीसी (NTPC) आणि टायटन (TITAN) मध्ये तेजी नोंदविली गेली. तर पॉवरग्रिड (POWERGRID), नेस्लेइंडिया (NESTLEIND) आणि एचसीएस टेकचा (HCLTECH) समावेश घसरणीच्या शेअर्समध्ये झाला.

SBI, Kotak Bank, ICICI Bank मध्ये घसरण

आज(सोमवार) शेअर बाजारात विक्रीचा दबाव अधिक दिसून आला. निफ्टीवर बँक निर्देशांकात 0.90 टक्क्यांच्या नजीक घसरण झाली. कोटक बँक आणि बंधन बँक मध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदविली गेली. तर SBI, RBLBANK आणि INDUSINDBK मध्ये 1.5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

पेटीएम (Paytm) शेअर्समध्ये घसरणीचं सत्र

पेटीएमची पॅरेंट कंपनी One 97 Communications च्या शेअर्स मध्ये सातत्याने घसरणीचं सत्र दिसून येत आहे. आज (सोमवारी) पेटीएमचे शेअर 2.70% टक्क्यांच्या घसरणीसह 580.90 रुपयांवर ट्रेड करत होते. शेअर बाजाराच्या अभ्यासकांच्या मते आगामी काही दिवसांत पेटीएमच्या शेअर्समध्ये अधिक घसरण नोंदविली जाऊ शकते.

आजचे वधारणीचे शेअर्स (TOP GAINERS TODAY) • कोल इंडिया (%3.26) • हिंदाल्को (%2.28) • यूपीएल (%1.88) • ओएनजीसी (%1.32) • एचडीएफसी बँक (%0.44)

आजचे घसरणीचे शेअर्स (TOP LOSSERS TODAY)

• ब्रिटानिया (-3.53) • टाटा कॉन्स प्रॉडक्ट (-3.17) • पॉवर ग्रिड कॉर्प (-3.14) • ग्रॅसिम (-3.11) • श्री सिमेंट (-2.91)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.