Best Multibagger Stock: ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल; दोन वर्षांत 35 रुपयांचा शेअर पोहोचला 654 रुपयांवर

बोरोसिल रिन्यूएबल्स ही कंपनी डिनर सेट, काचेची भांडी आणि बाटल्या तयार करण्याचे काम करते. गेल्या दोन वर्षांमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी उसळी पहायला मिळाली. या कंपनीचे शेअर्स 34.75 रुपयांवरून 654.50 रुपयांवर पोहोचले आहेत.

Best Multibagger Stock: 'या' कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल; दोन वर्षांत 35 रुपयांचा शेअर पोहोचला 654 रुपयांवर
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 12:26 PM

Best Multibagger Stock : देशावर गेले दोन वर्ष कोरोना (Corona) संकट होते. कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा (Lockdown) फटका सर्व क्षेत्राला बसल्याचे पहायला मिळाले. कोरोना काळात उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. या नकारात्मक वातावरणाचा प्रभाव हा भारतीय शेअरबाजारावर (Stock market) देखील झाल्याचे पहायला मिळाले. अनेकांनी या काळात शेअरमधील आपली गुंतवणूक काढून घेतल्याने शेअर बाजारावर मोठा दबाव या काळात पहायला मिळाला. या काळात शेअर बाजार इतका अस्थिर झाला होता की, शेअर बाजार स्थिर कधी होणार हे सांगणे या क्षेत्रातील तज्ज्ञाना देखील अशक्य होते. मात्र अवघ्या काही दिवसांतच शेअर बाजारामध्ये मोठा बदल पहायला मिळाला. निर्बंध उठताच शेअर बाजारात तेजी दिसून आली. याच काळात काही शेअर्सनी तर गुंतवणूकदारांना तगडा परतावा दिला. अशाच शेअरमध्ये बोरोसिल रिन्यूएबल्स लिमिडेटच्या शेअरचा समावेश होतो. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

शेअरमध्ये मोठी उसळी

बोरोसिल रिन्यूएबल्स ही कंपनी डिनर सेट, काचेची भांडी आणि बाटल्या तयार करण्याचे काम करते. गेल्या दोन वर्षांमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी उसळी पहायला मिळाली. या कंपनीचे शेअर्स 34.75 रुपयांवरून 654.50 रुपयांवर पोहोचले आहेत. या कंपनीच्या शेअर्स तब्बल 1,783 टक्क्यांनी वाढला आहे. पुढील काळात देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 16.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षभरात या कंपनीचा शेअर्स 330 रुपयांवरून 654.50 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 165 टक्क्यांची वाढ झाली आहे.

एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 18.83 लाखांचा परतावा

या कंपनीच्या शेअर्सने गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. या स्टॉकमध्ये जर कोणी आठ एप्रिल 2020 ला एक लाखांची गुंतवणूक केली असेल तर संबंधित व्यक्तीला कंपनीच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीनुसार आठ एप्रिल 2022 रोजी तब्बल 18.83 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. सध्या रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी -मंदीचे वातावरण पहायला मिळत आहे. मात्र जरी असे असले तरी देखील काही कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत.

संबंधित बातम्या

रामदेव बाबांना आले ‘अच्छे दिन’ रुची सोयाने फेडलं 3000 कोटींचं कर्ज

12 वर्षांखालील मुलांसाठी LIC ची नवी पॉलिसी, दिवसाला 100 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करा…

Reserve Bank of India : सामनाच्या अग्रलेखातून रिझर्व्ह बॅंकेवरती टीका, निवडणुकांमुळे इंधन दरवाढ कशी रोखून ठेवली

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.